Liquor Seized  pudhari photo
सिंधुदुर्ग

Goa Liquor Seized | इन्सुलीत १ कोटीची गोवा दारू जप्त; चालक ताब्यात

इन्सुलीत १ कोटीची गोवा दारू जप्त; चालक ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

बांदा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खालसा पंजाबी ढाब्यासमोर मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ३ लाख ६८ हजार रुपयांची गोवा दारू जप्त केली. तसेच २० लाखांच्या कंटेनरसह चालकास ताब्यात घेतले. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह. आयुक्त पी. पी. सुर्वे, विभागीय उपआयुक्त कोल्हापूर विभाग विजय चिंचाळकर, राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्गच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार इन्सुली तपासणी नाका पथकाने ८ मे रोजी पहाटे ५.३० वा. च्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रकची तपासणी केली असता वाहनाच्या मागील हौद्यातील मोठ्या लाकडी पेट्यांमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या १८० मिली मापाच्या प्रत्येकी ४८ सिलबंद बाटल्या असलेले एकूण १०८० बॉक्स आढळून आले.

मद्याची किंमत अंदाजे १ कोटी ३ लाख ६८ हजार रुपये आहे. या प्रकरणी वाहन चालक पंकज गोविंद व्यास (३३, रा. डांगराखेडा, जि. देवास, मध्यप्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले. १ कोटी ३ लाख ६८ हजार रुपयांची दारू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक २० लाख रुपये असा एकूण १ कोटी २३ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करीत आहेत. ही कारवाई दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, मिलिंद माळी, जवान तथा वाहन चालक रणजीत शिंदे, जवान दिपक वायदंडे, सतीश चौगुले व अभिषेक खत्री यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT