Sindhudurg Disaster Management Alert 2026 
सिंधुदुर्ग

Sindhudurg | आपत्कालीन परिस्थितीत २४ तास सतर्क रहा!

Sindhudurg Disaster Management Alert 2026-नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या सूचना - कुडाळ न.पं. मान्सूनपूर्व आढावा बैठक

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ :सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण विभागाने मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करावीत. पावसाळ्यात आपाकालीन परिस्थितीत सर्व संबंधित यंत्रणांनी २४ तास सतर्क रहावे, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित यंत्रणांनी तातडीने त्या ठिकाणी पोचत नागरिकांना मदत मिळाली पाहीजे कोणतीही हथगय होता नये, अशा सक्त सूचना कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिस्वलकर यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिल्या.

कुडाळ नगरपंचायतीची मान्सूनपूर्व आढावा बैठक मंगळवारी सायंकाळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी विनायक औंधकर, नगरसेविका अक्षता खटावकर, ज्योती जळची, नयना मांजरेकर, न.पं. महा. प्रशासन अधिकारी राजू पठाण, सा.बां.चे ईश्वर बामणे, एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश रेवंडकर, ग्रामीण रुग्णालयाचे विनोद जाधव, तालुका आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक आर. डी. चेंदवणकर, महावितरणचे प्रथमेश केळकर, न. पं. स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर, गजानन पेडणेकर, पोलिस ठाण्याचे प्रतिनिधी योगेश वेंगुर्लेकर, पशुसंवर्धन खात्याचे एस. पी. फणसेकर, एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी आदीसह विविध खात्यांचे खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य विभाग पावसाळ्यासाठी सज्जा पावसाळ्यासाठी आरोभा विभाग सज्ज असून, आफत्कालीन परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य विभागाने अॅक्शन प्लॅनहीं तयार केला आहे.

पुरवाधित भागात आरोग्य यंत्रणेचे विशेष लक्ष असणार असून, औषधसाठाही मुबलक प्रमाणात उपलब्य असल्याची माहीती, तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली. गटारे मोकळे करा; रस्त्यावर एकही खड्डा दिसता नयेः न.पं. अंतर्गत सर्व रस्ते सुस्थितीत करण्याची कामे पूर्ण होत आली आहेत. परंतु सार्व बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी. सा.बांच्या अनेक रस्त्यांना गटारे नसल्याने पावसाळ्यात सत्यांवर पाण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे सा.बां. खात्यांतर्गत रस्त्यांची दुरूस्ती तात्काळ करावी.

पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसता नये याची दक्षता घ्यावी तसेच रस्ता दुतर्फा बुजलेली गटारे त्वरित मोकळी करवीत, नाबरवाडी रेल्वे ब्रीज जवळील रस्त्यांवर पावसाळ्यात खमुघांची समस्या निर्माण होते, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी. रस्ता दुतर्फा झाडी हटवावी साईडपट्टी सुस्थितीत करावी, अशा सूचना नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी सा. बां. विभागाल्या दिल्या. बीज समस्या तातडीने सोडवा, पुरवठा सुरळीत ठेवया धोकादायक वौज पोल व वाहिन्या बदलून दुरूस्ती करावी. वाहिन्यांवरील झाडी हटवा. सर्व वीज समस्या पावसाळ्यापूर्वी तातडीने सोडवाव्यात, पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्या.

आपत्कालीन परिस्थितीत 24 तास अधिकारी व कर्मचारी अलर्ट असाग्रेत, नागरीकांच्या फोनना महावितरण कडून जलद प्रतिसाद मिळालाच पाहिजे, अशा सूचना महावितरण प्रशासनाला दिल्या रुग्णवाहिका आहे पण ड्रायव्हर नाही! ग्रामीण रुग्णालयाला रुग्णवाहिका आहे परंतू त्यासाठी चालक नसल्याची बाब यावेळी बैठकीत उघड झाली. चालक मिळण्याबाबत वरिष्ठ सारावर पाठपुरावा सुरू असल्याची माहीती ग्रामीण रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी दिली.

पशुसंवर्धन विभागाने अलर्ट रहाने त्यावर तालुका पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत गुरांना मान्सूनपूर्व लसीकरण करण्यात आल्याची माहिती अधिकायांनी दिली. पूरपरिस्थितीत या दवाखान्यातील यंत्रणा सतर्क असली पाहीजे. प्रशिक्षित कर्मचारी दवाखान्यात कार्यरत ठेवायेत तसेच औषधसाठाही उपलब्ध करून ठेवण्यात यावा, अशा सूचना नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी दिल्या, एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश रेवंडकर यांनी एमआयडीसीतील सर्व रस्ते सुस्थितीत असल्याचे सांगितले.

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद!

पोलिस प्रशासनामार्फत शहरात बसविलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. ते तात्काळ सुरू करावेत. पावसाळ्यात चोरीच्या घटना घडतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आवश्यक ती दक्षता घेण्याची सूचना नगराध्यक्षांनी पौलिस प्रशासनाला दिली. त्यावर पोलिसांच्या उपस्थित प्रतिनिधींनी सीसीटिव्ही कॅमेरे बालू करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी पोलिस प्रशासन पूर्ण तयारीनीशी सज्ज आहे. आपत्कालीन बोट नादुरुस्त असून, दुरुस्तीबाबत वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सांगितले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT