बारामती : संत ज्ञानेश्वर महाराज पालखीत सहभागी सिंधुदुर्गातील वारकरी. (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Spiritual Walk Sindhudurg | सिंधुदुर्गातील भजनी कलाकारांची पायी वारी

Dnyaneshwar Palkhi Wari | संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीत चालले 18 किलोमीटर

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 108 भजनी कलाकारांनी आषाढी एकादशी निमित्त बारामती ते पंढरपूर मार्गावर पायी वारी केली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत फलटण ते बरड अशी पायी वारी त्यांनी केली.

भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग या भजनी कलाकारांच्या संस्थेने पुढाकार घेऊन या पायी वारीचे आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष भजनी बुवा संतोष कानडे यांनी नियोजन केले होते. जिल्ह्यातील 108 भजनी कलाकारांना फलटण पर्यंत घेऊन जाण्यासाठी ज्या दोन लक्झरी बस आवश्यक होत्या .त्या बस जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी उपलब्ध करून दिल्या होत्या. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या या पालखी सोहळ्यातील सोळाव्या दिंडीमध्ये हे सिंधुदुर्गातील भजनी कलाकार सहभागी झाले होते.

पालखीच्या मागे 400 आणि जवळपास पुढे 400 अशा 800 दिंड्या होत्या. जवळपास सहा ते सात लाख लोक या पायी वारीमध्ये सहभागी झाले होते.सिंधुदुर्गचे भजनी बुवा आणि कलाकारांनी इथूनच टाळ मृदुंग विना अशी वाद्य नेली होती. ही वाद्य वाजवत सिंधुदुर्गातील भजनी कलाकारानी अनेक अभंग आणि गजर गायिले.स. 6वा. वाजल्यापासून या वारीत या कलाकारांनी पायी चालण्यास सुरुवात केली. संध्या. 6 वा. र्यंत बारा तासात तब्बल 18 किलोमीटर अंतर कापले.

पायी चालण्याचा अनुभव अध्यात्मिक होता. वारीतील आनंद खूपच मोठा होता. सिंधुदुर्गातील भजनी कलाकारांनी पायी वारीत सहभाग घेऊन अभंग भजने गायल्यामुळे इतर वारकर्‍यांना ही खूप आनंद झाला. वारीत चालताना अनेक स्वयंसेवी संस्था चहापाणी जेवण आणि इतर सोयी सुविधा पुरवत होते. महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे काय हे या वारीतून पाहायला मिळाले.या वारीसाठी पालकमंत्री नीतेश राणे यांनी बसेसची सुविधा केली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.
बुवा संतोष कानडे, अध्यक्ष, भजनी कलाकार संस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT