Sindhudurg News | हॉटेल व लॉजिंगसाठी स्वच्छता ‘ग्रिन लिफ रेटिंग’

District Collector Anil Patil | जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची माहिती; जिल्ह्यातील व्यावसायिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
Sindhudurg News
जिल्हाधिकारी अनिल पाटील(Pudhari File Photo)
Published on
Updated on
Summary
  • गुणांकनानुसार 1, 3 व 5 असे लिफ रेटिंग मिळणार

  • घनकचरा, मैलागाळ व सांडपाणी व्यवस्थापन निकषांवर होणार गुणांकन

  • स्वयंमूल्यांकन अर्ज सादर करण्यासाठी 30 जुलै पर्यंत मुदत

  • जिल्ह्यातील पर्यटनाकरीता पूरक योजना

ओरोस : जिल्ह्यातील हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास यांचे स्वच्छता ग्रिन लिफ रेटिंग अंतर्गत गुणांकन होऊन 1, 3 व 5 असे लिफ रेटींग देण्यात येणार आहे. या रेंटिंगच्या माध्यमातुन देशी- विदेशी पर्यटक येथील हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास आस्थापनेना भेट देतील. त्याचा फायदा जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय वाढण्याकरीता होऊ शकतो. ग्रिन लिफ रेंटिंगकरीता लागणारा स्वंयमुल्याकन फॉर्म जि. प. सिंधुदुर्गच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास व्यवसायिकांनी या कार्यक्रमांत सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील, यांनी केले आहे.

स्वच्छता ग्रिन लिफ रेटिंग कार्यक्रमांचे आयोजन करण्याकरीता 30 जून रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. जि. प. सीईओ रवींद्र खेबुडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, तीनही प्रातांधिकारी, सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.

image-fallback
ओरोस-देऊळवाडा अंगणवाडी जिल्ह्यात स्वच्छ व सुंदर!

हॉटेल आस्थापनांनी आपले स्वंयमुल्यांकन करुन अर्ज पंचायत समिती येथे 30 जुलै पर्यत सादर करावयाचा आहे. स्वच्छता ग्रिन लिफ रेटिंग अंतर्गत तालुकास्तरावर पडताळणी समितीमध्ये उपविभागिय दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पर्यटन किंवा उद्योग क्षेत्रातील, पाणी पुरवठा विभाग अधिकारी यांचा समावेश आहे. तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन तथा जिल्हा समन्वयक (स्वच्छ भारत मिशन) सदस्य सचिव, पर्यटन विभाग चढऊउ जिल्हा प्रतिनिधी सदस्य, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.) व जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने पर्यटन, हॉटेल उद्योगातील प्रतिनिधी सदस्य यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती जिल्ह्यातील हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास यांची तपासणी करणार आहे.

Sindhudurg News
Sindhudurg News |दाभोली येथील मारहाण प्रकरणी वैभव नाईक, परशुराम उपरकर यांची वेंगुर्ले पोलीस स्थानकात धडक

असे होणार मूल्यांकन

पाणी पुरवठा स्वच्छता मंत्रालय व पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत जिल्ह्यातील हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास यांचे घनकचरा व्यवस्थापन, मैलागाळ व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन या तीन निकषांवर गुणांकन होणार आहे. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत 80 गुण, मैला गाळ व्यवस्थापन करीता 80 गुण तर सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत 40 गुण असे 20 गुण निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये 100 ते 130 गुण ज्या आस्थापनेस मिळणार आहेत त्याना 1 लिफ, 130 ते 180 गुण मिळविणर्‍या आस्थापनेस 3 लिफ तर 180 ते 200 गुण प्राप्त करणार्‍या आस्थापनेस 5 लिफ गुणांकन प्राप्त होणार आहे. मात्र 1 लिफ गुणांकण प्राप्त करण्याकरीता मैलागाळ व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत किमान 40 गुण तर सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत किमान 20 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. 3 लिफ गुणांकण प्राप्त करण्याकरीता मैलागाळ व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत किमान 50 गुण तर सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत किमान 20 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. 5 लिफ गुणांकण प्राप्त करण्याकरीता मैलागाळ व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत किमान 60 गुण तर सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत किमान 30 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास या आस्थापनांना ग्रिन लिफ रेटिंग अंतर्गत मिळणारे 1 ते 5 असे लीफ रेटिंग जिल्ह्यातील पर्यटनाकरीता पुरक ठरणार आहे. जिल्ह्यातील सर्व हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास आस्थापना यांनी ग्रिन लिफ रेंटिंग करीता लागणारा स्वंयमुल्यांकन फॉर्म जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांचे संकेतस्थळावरुन घेऊन पंचायत समिती येथे सादर करावा

अनिल पाटील, जिल्हाधिकारी-सिंधुदुर्ग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news