सावंतवाडी : यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांना रेल्वेच्या अपुर्या सुविधेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम आणि कोकण रेल्वे मार्गावरील इतर समस्यांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी थेट त्यांच्याकडे तक्रार करण्याची मोहीम सुरू केली आहे.
सत्ताधारी आणि विरोधी नेते मंडळींना वेळोवेळी निवेदने देऊन, उपोषण व आंदोलने करूनही सावंतवाडी टर्मिनसच्या कामाला गती मिळत नसल्याने अखेरीस चाकरमानी आणि स्थानिक गावकर्यांच्या मदतीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ई-मेलद्वारे साकडे घालण्याचा निर्णय कोकण रेल्वे टर्मिनस संघर्ष समितीने घेतला आहे.
यंदा गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे प्रशासनान मुंबईतून जादा गाड्या सोडून उत्तम नियोजन केले असले, तरी पुण्याहून कोकणासाठी एकही विशेष गाडी सोडण्यात आली नाही. यामुळे कोकणवासीयांना रेल्वे टर्मिनसचे महत्त्व पुन्हा एकदा पटले. सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनसचे काम गेल्या 10 वर्षांपासून रखडलेले आहे. स्थानके बाहेरून सुस्थितीत दिसत असली, तरी फलाटांवर शेडसारख्या आवश्यक सुविधांचा अभाव आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन, प्रवाशांनी स्वतःहून पंतप्रधानांकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक या भागातही मोठ्या प्रमाणात चाकरमानी आहेत मुख्यतः पुणे भागातून चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होत असतात; मात्र रेल्वे प्रशासनाने पुणे-सावंतवाडी किंवा मडगाव पर्यंत एकही गणेशोत्सव स्पेशल रेल्वे सोडली नाही, याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पहिली पायरी : pmopg.gov.in/CitizenReforms/Registration/Index या वेबसाईटवर जा. ही वेबसाईट थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार नोंदवण्यासाठी आहे. दुसरी पायरी: वेबसाईटवर नाव, पत्ता, ई-मेल आणि फोन नंबर भरून नोंदणी करा. भविष्यात तक्रारीची स्थिती पाहण्यासाठी एक नवीन पासवर्ड तयार करा. तिसरी पायरी : ई-मेल व्हेरिफिकेशन झाल्यावर मोबाईलवर आलेला जढझ आणि सिक्युरिटी कोड टाकून फॉर्म सबमिट करा. चौथी पायरी:’ ठर्र्शिींशीीं/ॠीळर्शींरपलश ऊशीलीळिींळेप’ मध्ये सावंतवाडी टर्मिनसच्या रखडलेल्या कामाबद्दल सविस्तर माहिती लिहा.
तक्रार दाखल केल्यावर एक विशिष्ट क्रमांक (कोड) मिळेल. तो व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून किती लोकांनी या मोहिमेत सहभाग घेतला हे कळेल. ही मोहीम जास्तीत-जास्त कोकणवासीयांनी आणि मुंबईतील चाकरमान्यांनी पुढे न्यावी, जेणेकरून भविष्यात गणेशोत्सवातील प्रवास अधिक सुखकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.