मृणालिनी कशा‍ळीकर  
सिंधुदुर्ग

Sawantwadi Flood Relief- सावंतवाडीकर भाग्यवान... २५ वर्षांपूर्वीच्या पूरपरिस्थितीपासून कायमची मुक्ती !

माजी नगरसेविका मृणालिनी कशाळीकर यांनी उजाळल्या आठवणी

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी - सध्या महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा धुमाकूळ सुरू असताना, सावंतवाडीकरांना मात्र एका मोठ्या समस्येतून मिळालेल्या दिलासादायक मुक्तीची आठवण येत आहे. २०-२५ वर्षांपूर्वीच्या सावंतवाडीची आठवण काढल्यास, किरकोळ पावसातही शहरातील मुख्य भागांना पुराचा मोठा वेढा बसायचा. चंद्रभुवनपासून जयप्रकाश चौक आणि भाजी मंडई या मध्यवर्ती भागात पाणी तुडुंब साचायचे, ज्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान व्हायचे. मृणालिनी कशाळीकर तत्कालीन नगराध्यक्ष या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तथा माजी शिक्षणमंत्री आ. दीपक केसरकर यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.

शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणारा मुख्य नाला तुडुंब भरून वाहत असल्याने, त्यांच्या संकल्पनेतून या नाल्याच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. दर्जेदार काम आणि नियोजनबद्ध आराखडा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम सावंतवाडीतील प्रसिद्ध इंजिनियर नाना कशाळीकर यांच्या 'कशाळीकर इंजिनियर्स अँड बिल्डर्स' या फर्मकडे सोपवण्यात आले होते. कशाळीकर यांनी मागील पावसाचे सर्व रेकॉर्ड तपासून, पर्जन्यक्षेत्राचा अचूक विचार केला. तसेच परिसरातील वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन, नाल्यासाठी अत्यंत प्रभावी अशी बॉक्स कल्व्हर्ट (Box Culvert - R.C.C.) योजना मंजूर करून आणली.

हे आव्हानात्मक काम 'मातोंडकर असोसिएट्स' यांनी जलद गतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण केले. सावंतवाडीकरांना पुरापासून कायमची मुक्ती या यशस्वी आणि दूरगामी नियोजनामुळे नाल्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सावंतवाडीकरांना पुराचा कधीही, कसलाही त्रास झाला नाही. आज संपूर्ण राज्यात पावसाने हाहाकार माजवला असतानाही सावंतवाडी शहर सुरक्षित आहे, म्हणूनच 'सावंतवाडीकर भाग्यवान' असल्याची भावना माजी नगरसेविका मृणालिनी कशाळीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT