सावंतवाडी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये ठराव घेण्यावरुन खडाजंगी उडाली. (छाया: नागेश पाटील) pudhari photo
सिंधुदुर्ग

Sawantwadi | सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये खडाजंगी !

सावंतवाडी न.पं. सर्वसाधारण सभा

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी: सावंतवाडी शहरातील सुवर्ण कॉलनी येथील जागा हस्तांतरण करण्याचा ठराण घेण्यावरुन नगरपालिकेच्या सभेत गटनेते खेमराज कुडतरकर व सत्ताधारी नगरसेवक यांच्यात खडाजंगी उडाली. मागील दोन सभेमध्ये मागणी करुनही ठराव घेण्यात आला नाही, अशी टीका करत आमचे प्रश्न आणि कामे आणूनबुजून घेतले आत नाहीत असा आरोप श्री. कुडतरकर यांनी केला. जोपर्यंत आमचा ठराव घेतला जात नाही, तोपर्यंत सभा सुरु करु देणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. या विषयावरुन सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये ..तू.मै.मै. झाली अखेरीस नगराध्यक्षा श्रध्दाराजे भौसले यांनी हसाक्षेप करत आपण याबाबत लेखी द्वाा लवकर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

सावंतवाडी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी नगराध्यक्षा श्रध्दाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात झाली. उपनगराध्यक्ष अॅड अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते. सुरुवातीलाच विषयांचे वाचन सुरु असताना विरोधी गटनेते बाबू कुडतरकर यांनी हस्तक्षेप केला. मागील दोन सभेत आपण ठराव मांडल्याप्रमाणे माझ्या प्रभागातील सुवर्ण कॉलनी येथे सभागृ उद्यान व सुशोभिकरणासाठी ३० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या जागेचे मालक हयात नसल्याने जागेची हस्तांतरण प्रक्रिया रखडली आहे, त्याचे काय झाले? प्रशासक असणाऱ्या तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांनी निधी मंजूर असून देखील हा प्रस्ताव फेटाळला होता, असे सांगत हा मुद्दा उचलून धरला.

त्यावर नगराध्यक्षा यांनी आपण पत्र या त्यावर निर्णय घेऊ असे सांगितले. मात्र मागील सलग दोन सर्वसाधारण सभेत भी ठराव मांडला आहे. पत्र देण्याची गरज नाही यावर तातडीने ठराव ध्या, अन्यथा सभा सुरु करु देणार नाही असा पवित्रा श्री. कुडतरकर यांनी घेतला. त्यात अॅड, नीता कविटकर यांनी उडी घेत हा विषय मागील दोन बैठकांपसून सुरु आहे. त्यावर याच बैठकीत निर्णय झाला पाहिजे. त्यावेळी नगराध्यक्ष कोण तरी होते, त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही असा उपरोधिक टोला लगावला. यावर सत्ताधारी नगरसेवक खवळले. 'कोण तरी या शब्दाला आक्षेप घेत सुधौर आडिवरेकर, आनंद नेयगी, नौलम नाईक, अॅड. सिध्दार्थ भांबुरे, प्रतीक बांदेकर विरोधकांवर तुटून पडले. त्यांनी एकच गदारोळ करत कोण तरी' म्हणजे कोण, ते पद‌सिध्द उपनगराध्यक्ष आहेत, त्यांच्या पदाचा मान ठेवा असे खडेबोल सुनावले.

आनंद नेवगी यांनी उभे राहत विरोधी नगरसेविका नीता कविटकर यांना त्यांचे नाव घ्या असे सांगितले. त्यावर नगराध्यक्षांनी आपण इये विकासाबी चर्चा करायला आलो आहोत, वाद घालायला नाही त्यामुळे सर्वांचा आदर करून बोला असे निर्देश दिले. विरोधी गटनेते बाबू कुडतरकर यांनी आपण त्या जागेसाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. काही कामे निधीतून झाली आहेत आता निधी मंजूर करुनही अर ती जागा नावावर नाही झाली आणि प्रस्ताव फेटाळले तर आम्ही विकासकामे कशी करायची असा सवाल केला. यावर सत्ताधारी नगरसेवक भांबुरे यांनी अध्यक्ष यांनी निर्णय घ्यावा, अन्यथा हा विषय पुढील मिटींमध्ये ठेवावा अशी सूचना केली. त्यावर विरोधी नगरसेवक गौदावळे यांनी यावर याच बैठकीत निर्णय झाला पाहिजे असे सांगितले. त्यावर नगराध्यक्षांनी मी ऐकून घेतले आहे. पत्र द्या निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

सावंतवाडी शह हद्‌दीतील मोबाईल टीवर्सची कर आकारणीपोटी ८ लाख ४८ हजार ४३ रुपयांची थकबाकी आहे. ती तातडीने वसूल करावी, असे प्रतीक बांदेकर यांनी सांगितले. शहरात गैर, नळपाणी पाईपलाईनसाठी रस्ते खोदाई करण्यात आली आहे. काहीं ठिकाणी कामे पूर्ण झाली तरी अद्याप तेथील डांबरीकरण झालेले नाही. ही कामे कधी करणार? असा सवाल श्री. कुडतरकर यांनी केला. त्यावर डांबरीकर कामांना सुरुवात झाली आहे १५ मे पूर्वी संपूर्ण शहरातील डांबरीकरण पूर्ण केले जातील असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले.

शहरात सुरु फुटपाथवे कान प्रशासनाला कल्पना न देताच शुरु असल्याने यावर तौकीर शेख यानी आक्षेप घेतला. या कामाची कल्पना मुख्याधिकारी यांना तरी आहे का? असा सवाल केला. बाबू कुन्द्रतरकर यांनी गॅस पाईपलाईन नळयोजना पाईपलाईनची कामे कोण करत वाचे उत्तर द्यावे असे बिचारले. सर्वोदयनगर येते नळ व गैस पाईपलाईन बोदाई झाली आहे. काही ठिकाणी पाईपलाईन फुटली असून माती भराव टाकला आहे. या भागात गढूळ पाणी येत असून ठेकेदारावर कारवाई करा. अशी मागणी अजय गोंदावळे यांनी केली.

सत्काराच्या मुद्यावरून गदारोळ

सावंतवाडी शहराच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी पालकमंत्री निलेश राष्णे, भाजप नेते रवींद्र बव्हाण यांना नगरपालिकेने बोलावून तयांचा सत्कार करावा, अशी सूचना नगरसेवक गोंदावळे यांनी केली. त्यावर सत्ताधारी नगरसेवकांनी सभागृहात बेंच वाजवून त्यांच्या सूचनेला अनुमोदन दिले. नगराध्यक्षा आदाराजे भोंसले यांनी आपण सर्वांनाच बोलवून त्यांचा सत्कार करू, असे आश्वासन दिले. विरोधी नगरसेवक असून पालकमंत्री व भाजप नेते यांच्या सत्काराया मुद्दा सभागृहात मांडल्यामुळे यावरुन सभागृहात गदारोळ उडाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT