सरपंच पदाची आरक्षण सोडत काढताना तहसिलदार, नायब तहसिलदार  Pudhari Photo
सिंधुदुर्ग

कुडाळ तालुक्यातील ६८ गावांच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर

Sindhudurg Gram Panchayat Election | तहसीलदार, नायब तहसीलदारांची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : कुडाळ तालुक्यातील 68 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात हुमरमळा वालावल, हुमरमळा अणाव, तुळसुली क. नारूर, शिवापूर यांसह 9 ग्रा.पं.त नामाप्रवर्ग तर कसाल, पावशी, पिंगुळी, माणगांव यांसह 9 ग्रा.पं.त नामाप्र महिला सरपंच पदे आरक्षित झाली. वेताळबांबर्डे, परबवाडा पाट, नेरूर कर्याद नारूर, पणदूर, डिगस, वाडोस, वसोली यांसह 22 ग्रा.पं.त सर्वसाधारण प्रवर्ग (खुला - पुरूष/स्त्री) तर कडावल, तुळसुली तर्फ माणगांव, नेरूर देऊळवाडा, ओरोस बुद्रुक, आकेरी, चेंदवण, वालावल यांसह 22 ग्रा.पं.त सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सरपंच पदे आरक्षित करण्यात आली. अनुसूचित जातीसाठी 5 व अनुसूचित जमातीसाठी 1 सरपंच पद आरक्षित झाले. (Sindhudurg Gram Panchayat Election)

कुडाळ तालुक्यातील 68 ग्रामपंचायतींची सन 2025-2030 या कालावधीसाठी सरपंच पदाचा आरक्षण सोडत कार्यक्रम मंगळवारी (दि.८) येथील सिद्धिविनायक हॉलच्या सभागृहात पार पडला. यावेळी तहसीलदार वीरसिंग वसावे, नायब तहसीलदार संजय गवस व अमरसिंह जाधव, निवडणूक नायब तहसीलदार पिळणकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंच पदे - प्रवर्ग २ व महिला ३, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंच पदे - प्रवर्ग १ व महिला ०, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंच पदे - प्रवर्ग ९ व महिला ९ आणि खुला प्रवर्ग - प्रवर्ग २२ व महिला २२ अशा एकूण ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. आद्यश्री वेंगुर्लेकर (इयत्ता पहिली) व रणवीर गावडे या शालेय मुलांच्या हस्ते सरपंच पदाची सोडत चिठ्ठ्या काढून काढण्यात आली.

अनुसूचित जाती (महिला) - आंबडपाल, वाडीवरवडे व रानबांबुळी तर जनरल (प्रवर्ग)साठी बांबुळी आणि निरूखे सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचित जमाती (प्रवर्ग) - आंब्रड, महिला - 0. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) - कसाल, साळगाव, पावशी, पिंगुळी, निवजे, माड्याचीवाडी, माणगांव, आवळेगाव ओरोस खुर्द व पुळास. नागरिकांचा मागास प्रवर्ग (जनरल - पुरूष/स्त्री) - हुमरमळा वालावल, तुळसुली क.नारूर, शिवापूर, नानेली, मांडकुली, गोठोस, गोवेरी, नारूर क.नारूर, हुमरमळा अणाव.

खुला प्रवर्ग (सर्वसाधारण महिला) - हुमरस, कडावल, कुंदे, पांग्रड, तुळसुली तर्फ माणगांव, पडवे, मुळदे, नेरूर देऊळवाडा, गिरगाव-कुसगाव, जांभवडे, आंदुर्ले, पोखरण-कुसबे, कुपवडे, सरंबळ, ओरोस बुद्रुक, वर्दे, भडगाव बुद्रुक, तेर्सेबांबर्डे, अणाव, आकेरी, चेंदवण व वालावल. खुला प्रवर्ग (सर्वसाधारण - पुरूष/स्त्री) - भरणी, वसोली, बांव, पणदूर, तेंडोली, गावराई, झाराप, घोडगे, कवठी, सोनवडे तर्फ हवेली, डिगस, परबवाडा पाट, केरवडे कर्याद नारूर, हिर्लोक, वेताळबांबर्डे, घावनळे, नेरूर कर्याद नारूर, सोनवडे तर्फ कळसुली, बिबवणे, कालेली, वाडोस व केरवडे तर्फ माणगाव, अशी सरपंच पदे आरक्षित करण्यात आली.

यावेळी राजन नाईक, कृष्णा धुरी, प्रदिप गावडे, गोट्या चव्हाण, कानू शेळके, मिलिंद नाईक, मंदार कोठावळे, मनोज पाताडे, राजन भगत, योगेश बेळणेकर, विनायक अणावकर, विजय वारंग, समाधान परब, मंगेश मर्गज, आरती वारंग, दीपक जाधव, अश्पाक कुडाळकर, दिलीप तवटे, भूपेश चेंदवणकर आदींसह नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT