सिंधुदुर्ग आरटीओची खासगी बसवर कारवाई!

91 बसची तपासणी : 20 गाड्यांवर 2 लाखांची दंडात्मक कारवाई
Sindhudurg News
सिंधुदुर्ग आरटीओची खासगी बसवर कारवाई!file photo
Published on
Updated on

कुडाळ : सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विभागाच्या पथकाने गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील इन्सुली व ओसरगाव या दोन चेक नाक्यांवर 91 खासगी बसची तपासणी केली. यात 20 गाड्यांवर दंडात्मक कारवाई करून 2 लाख 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. आरटीओच्या या धडक कारवाईमुळे खासगी बस चालक - मालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून खासगी बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. या बसेसमधून मोटारसायकल, खासगी सामान, यासह सध्या हंगाम सुरू असल्यामुळे आंब्याच्या पेट्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शनिवार 5 रोजी इन्सुली चेक पोस्ट व रविवार 6 मार्च रोजी ओसरगाव चेक नाक्यावर धडक कारवाई करत खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण 91 बसेस तपासण्यात आल्या. यापैकी 20 गाड्यां मध्ये आंब्याच्या पेट्या व इतर खाजगी साहित्य आढळून आल्याने कारवाई करत 2 लाख 10 हजार रुपये दंड आकारण्यात आला. ही कारवाई यापुढे ही अशीच सुरू राहणार असल्याचे सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी सांगितले.

कारवाईची धूळफेक...मनसे करणार स्टिंग ऑपरेशन

सिंधुदुर्ग आरटीओमार्फत सुरू असलेल्या या कारवाईमध्ये पारदर्शकता नसून केवळ धूळफेक आहे, असा आरोप मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला. गेली अनेक वर्षे खाजगी बसेसमार्फत मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक केली जाते. यावर अनेक वाहतूक संघटनांनी आंदोलने केली, निवेदने दिली, तरीहीआरटीओ मार्फत कोणतीही कारवाई होत नव्हती. अलिकडेच आरटीओ विभागाला मनसेने टेम्पो (गुड्स) वाहतूक युनियन व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुकिंग एजंट यांना सोबत घेऊन मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आाला. त्यानंतर आरटीओने ही मार्फत कारवाई करण्यात आली आहे. आरटीओची कारवाई ही धुळफेक असुन याबाबत लवकरच मनसे स्टिंग ऑपरेशन करून ही बाब परिवहन आयुक्तांच्या नजरेत आणून देणार असल्याचे श्री. किनळेकर यांनी सांगितले.

बस मालकांची नावे सांगण्यास आरटीओची टाळाटाळ

सिंधुदुर्ग आरटीओने कारवाई केलेल्या खासगी बसेस कुणाच्या होत्या? याबाबत सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांना विचारले असता, त्या बसेस मालकांची नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला. दंडात्मक कारवाई करूनसुद्धा आरटीओ अधिकार्‍यांनी त्या बस मालकांची नावे सांगण्यास का टाळाटाळ केली? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता? याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news