कुडाळ : पिंगुळी-भूपकरवाडीमध्ये गोंदयाळे रोड परिसरातील एका मोकळ्या जागेत चिलीमद्वारे गांजा सेवन करणाऱ्या चार तरुणांवर कारवाई करत पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी रात्री ११.१५ वा. केली. यातील एक युवक अल्पवयीन असून, पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. याची फिर्याद हवालदार मेघश्याम भगत यांनी कुडाळ पोलिसांत दिली. यानुसार हवालदार प्रमोद काळसेकर यांच्यामार्फत पोलिसांनी भूपकरवाडी येथे धाड टाकली. घटनास्थळी पोलिसांना चार तरुण आळीपाळीने चिलीम ओढत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी छापा टाकून या चौघांनाही ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी चिलीममधून गांजा सेवन केल्याची कबुली दिली. सौरभ उमेश पिळणकर (१८, कोणार्क प्लाझा, कुडाळ बाजारपेठ), विजय दिवाकर मांजरेकर (१८, स्वामी समर्थनगर, हुमरमळा), श्वान रॉकी डिसोजा (१८, भूपकरवाडी, पिंगुळी), व एक 17 वर्षीय अल्पवयीन तरुण, अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांना ताब्यात घेऊन कुडाळ पोलिस ठाण्यात आणण्यात आले व त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.