Talere Market Accident Pudhari
सिंधुदुर्ग

Sindhudurg Accident | तळेरे बाजारपेठेत डंपरच्या धडकेत पादचारी जागीच ठार

मुंबई-गोवा महामार्गावरील तळेरे बाजारपेठेत अपघात

पुढारी वृत्तसेवा

Talere Market Accident

नांदगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील तळेरे बाजारपेठ येथे शनिवारी (दि.३१) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास डंपरच्या धडकेत एका पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रोहिदास हरिश्चंद्र देसाई (रा. तळेरे गावठण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रोहिदास देसाई हे तळेरेहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून पायी जात होते. त्याचवेळी याच दिशेने जाणाऱ्या डंपरची त्यांना जोरदार धडक बसली. डंपरचालक दया साटम (रा. नाद) यांच्या ताब्यातील डंपरची धडक बसल्याने देसाई रस्त्यावर कोसळले. त्यानंतर डंपरच्या मागील चाकाखाली सापडल्याने ते काही अंतरापर्यंत फरफटत गेले. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली.

अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, देसाई यांचा जागीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. अपघात नेमका कशामुळे घडला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

रोहिदास देसाई यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे तळेरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT