Sindhudurg Crime : दिगवळे बंधाऱ्याजवळील १५३ लोखंडी प्लेटस्‌ चोरीस

१ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल : अज्ञातावर गुन्हा
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

कणकवलीः नरडवे पाटबंधारे प्रकल्‍पांतर्गत बांधण्यात आलेल्‍या गडनदीवरील दिगवळे-किनवणेवाडी बंधाऱ्याजवळ उघड्या शेडमध्ये ठेवलेल्‍या पाटबंधारे विभागाच्या १५३ लोखंडी बरगे प्लेट्‌स अज्ञाताने चोरून नेल्‍या. त्‍यांची किंमत सुमारे १ लाख ५३ हजार रुपये आहे. ही घटना ७ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वा. ते ३० ऑक्‍टोबर रोजी सकाळी ९.३० वा. या मुदतीत घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद नरडवे प्रकल्‍प उपविभाग आंबडपालचे सहा.अभियंता विशाल तुकाराम सामंत यांनी कणकवली पोलिसात दिली. नरडवे पाटबंधारे प्रकल्‍पांतर्गत दिगवळे- किनवणेवाडी येथे कोल्‍हापूर बंधारा आहे.

या बंधाऱ्यातील पाणी अडवण्यासाठी लोखंडी बरगे प्लेट्‌सचा वापर केला जातो. सदर बंधाऱ्यातील लोखंडी प्लेट पावसाळ्यापूर्वी काढून त्‍या तेथील शेडमध्ये उघड्यावर ठेवल्‍या जातात. पावसाळा संपल्‍यानंतर पाणी अडवण्यासाठी त्‍या बंधाऱ्यावर पुन्हा बसवल्‍या जातात. नरडवे प्रकल्‍प उपविभाग आंबडपाल कार्यालयांतर्गत सदर बंधाऱ्याला लोखंडी प्लेट बसवण्याचे व काढण्याचे काम विठ्ठल रुक्‍माई मजूर सहकारी संस्‍था, ओसरगाव यांना देण्यात आले आहे. ते काम त्‍यांचा प्रतिनिधी नवनाथ वाघू पवार (रा. बोर्डवे) हे इतर कामगारांमार्फत करून घेतात.

शुक्रवार ३० ऑक्‍टोबर रोजी स. ९.३० वा. च्या सुमारास बंधाऱ्यावर प्लेट्‌स बसवण्याकरिता गेले असता दिगवळे किनवणेवाडी शेडमध्ये ठेवलेल्‍या लोखंडी प्लेट्‌स त्‍यांना दिसल्‍या नाहीत. याबाबत श्री. पवार यांनी सहा.अभियंता विशाल सामंत यांना फोन करून कळवले. त्‍यानंतर विशाल सामंत यांनी याबाबतची फिर्याद कणकवली पोलिस ठाण्यात दिली. त्‍यानूसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.