मळगाव : मातोंड-मिरीस्तेवाडी परिसरात सायंकाळच्या सुमारास पट्टेरी वाघ फिरत असल्याचे शेतकर्यांना आढळून आले. त्यामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
रविवारी सायंकाळी 6 वा. च्या सुमारास येथील शेतकरी अनिकेत रेडकर यांनी मातोड- मिरीस्तेवाडी रस्त्यावर पट्टेरी वाघ दिसून आला. या भागात प्रथमच पट्टेरी वाघ आढळून आला आहे.
हा पट्टेरी वाघ पुढे होडावडा-सुभाषवाडी रस्त्यावरून जाताना काजीरमाळा येथील शेतकरी अनिकेत जोशी यांनाही दिसला. मातोंड पंचक्रोशीतील जंगल भागात असलेला पट्टेरी वाघाचा वावर शेतकरी व पाळीव जनावरांंसाठी धोकादायक असल्याने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.