सातारा : सातारा हाफ हिल मॅरेथॉन ही जागतिक दर्जाची स्पर्धा रविवारी राजधानी सातार्यात जल्लोषात पार पडली. या स्पर्धेत कोसळत्या पावसात राज्यासह देशभरातील 8 हजार 500 धावपटू धावले. या स्पर्धेत पुरुषात सलगर (जि. सांगली) येथील अंकुश लक्ष्मण हाके हा विजेता ठरला. त्याने स्पर्धेचे 21 कि.मी.चे अंतर 1 तास 10 मिनिटांत पूर्ण करून पहिला क्रमांक पटकावला. महिला गटात सातारची साक्षी जडयाल विजेती ठरली. पुरुषात पंजाबच्या लव्हप्रीत सिंगने द्वितीय, तर राजस्थानच्या धर्मेंद्र डी. याने तिसरा क्रमांक पटकावला. विजेत्या धावपटूंनी अवघ्या सव्वा तासाच्या अंतरामध्ये ही स्पर्धा पूर्ण केली.
चौदाव्या सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ जिल्हाधिकारी संतोष पाटील , पोलिस अधिक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला. यावेळी जेबीजीचे गौरव जजोदिया, मालाज ग्रुपचे हुसेन माला, डॉ. शेखर घोरपडे, डॉ. प्रताप गोळे, डॉ. संदीप काटे, अॅड. कमलेश पिसाळ, अध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित, उपाध्यक्ष विशाल ढाणे, सेक्रेटरी शैलेश ढवळीकर, डॉ. अविनाश शिंदे यांच्यासह संयोजक उपस्थित होते. मॅरेथॉनला पोलिस कवायत मैदान येथून सुरुवात झाली. पारंगे चौक, पोवईनाका, शाहू चौक, नगरपरिषद, अदालतवाडा, समर्थ मंदिर चौक, बोगदा, पॉवर हाऊस, यवतेश्वर घाट मार्गे प्रकृती हेल्थ रिसॉर्टच्या 500 मीटर पुढे जावून त्याच मार्गाने पोलिस कवायत मैदान येथे मॅरेथॉनची सांगता झाली. टाळ्याच्या गजरात सातारकर धावपटूंचा उत्साह वाढवत होते.
पुरुष खुल्या गटात सलगर जि. सांगली येथील अंकुश लक्ष्मण हाके याने 1 तास 10 मिनिटे 8 सेंकदामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. पजांब येथील लव्ह प्रीत सिंग याने 1 तास 11 मिनिटे 6 सेंकद द्वितीय तर राजस्थानच्या धर्मेंद्र डी यांने 1 तास 12 मिनीटे 3 सेंकदामध्ये तृतीय क्रमांक पटकावला. महिला खुल्या गटामध्ये सातारच्या साक्षी संजय जडयाल
यांनी 1 तास 29 मिनीटे 35 सेंकद कालावधीत स्पर्धा पूर्ण करुन गटामध्ये पहिला क्रमांक पटकावला. कोल्हापूर येथील ऋतुजा विजय पाटील यांनी 1 तास 30 मिनीटे 52 सेंकदामध्ये द्वितीय तर कोल्हापूरच्याच सोनाली धोंडीराम देसाई यांनी 1 तास 33 मिनीटे 42 सेंकदामध्ये स्पर्धा पूर्ण करुन तृतीय क्रमांक पटकावला.
पुरुष 30 ते 34 वयोगटात अनंत गावकर प्रथम, विशाल कांबीरे द्वितीय, किशोर शिंदे तृतीय क्रमांक पटकावला. 35 ते 39 वयोगटात मनोज राणे प्रथम, अनिल कोरवी द्वितीय, प्रसाद दरेकर तृतीय क्रमांक पटकावला. 40 ते 44 वयोगटात परशराम भोई प्रथम, सुनील शिवणे द्वितीय, मनोहर बराई यांनी तृतीय क्रमांक पटकावला. 45 ते 49 वयोगटात मनजीत सिंग प्रथम, श्रीनिवास वायकर द्वितीय तर सवालीराम शिंदे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. 50 ते 54 वयोगटात रविंद्र जगदाळे प्रथम, धैर्यशील पाटील द्वितीय, रणजीत कणबरकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. 55 ते 59 वयोगटात हरीष चंद्रा प्रथम, गेरोज थॉमस द्वितीय तर हितेंद्र चौधरी यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
60 ते 64 वयोगटात केशव मोटे प्रथम, पांडूरंग चौगुले द्वितीय तर धर्मेंद्र चौहान यांनी तृतीय क्रमांक पटकावला. 65 ते 69 वयोगटात भुपेंद्र हार्दल यांनी प्रथम, महिपती संकपाळ द्वितीय तर अनिल खंडेलवाल यांनी तृतीय क्रमांक पटकावला. 70 ते 74 वयोगटात सतीश दिपनाईक प्रथम, गुलजारी चंद्रा यांनी द्वितीय तर नरीपन चौधरी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. 75 वर्षे वयोगटावरील छगन भिलाणी, दुष्यम पांडे, तुकाराम अगुंडे यांना सामूहिक प्रथम क्रमांक देण्यात आला आहे.
महिलांमध्ये 30 ते 34 वयोगटात सोनाली देसाई प्रथम तर क्लेरी जान्सन यांनी द्वितीय तर चंदन उदानी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. 35 ते 39 वयोगटात मनिषा जोशी प्रथम, प्रज्ञा अर्पिता द्वितीय तर अभिलाषा मोदेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. 40 ते 44 वयोगटात आचल मारवॉह प्रथम, सुषमा सिंग द्वितीय तर आरती झंवर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. 45 ते 49 वयोगटात पल्लवी मूग यांनी प्रथम, परुल पटेल द्वितीय तर पूजा झूनझूनवाला यांनी तृतीय क्रमांक पटकावला. 50 ते 54 वयोगटात निकीता गोविल प्रथम, वंदना टंडन द्वितीय तर डॉ. इंदू टंडन यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
55 ते 59 वयोगटात विद्या सुदर्शनवाला यांनी प्रथम, मिनाक्षी सिंग द्वितीय तर बिलिमा बनवाला यांनी तृतीय क्रमांक पटकावला. 60 ते 64 वयोगटात विद्या बेंडवाले प्रथम, सुषान चंपानवार द्वितीय तर एकादशी कोल्हटकरने तृतीय क्रमांक पटकावला. 65 ते 69 वयोगटात दुर्गा सील प्रथम, पुष्पा भट द्वितीय तर शशिकला शंकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. 70 ते 74 वयोगटात परवीन बाटलीवाला यांनी प्रथम, दिक्षा कनाविया द्वितीय तर रत्नप्रभा कुलकर्णी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तर 75 वर्षावरील गटात मीरा पारेख यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
विजेत्या स्पर्धकांना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व दैनिक ‘पुढारी’चे निवासी संपादक हरीष पाटणे, पोलिस अधिक्षक तुषार दोशी, बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्यासह मॅरेथॉनचे संयोजक यांच्या हस्ते बक्षिस देवून गौरव करण्यात आला.
जिल्हाधिकार्यांसह आयपीएस अधिकारीही सहभागी
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूरचे जिल्हा पोलीसप्रमुख योगेश कुमार, ठाण्याचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त श्रीकांत पाठक, फोर्स वनचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश केंद्रे, सिडकोचे सहसंचालक विकास सावंत यांच्यासह शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील अधिकार्यांनी सातारा हाफ हिल मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता.