सावंतवाडी : मळगाव रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांची बॅग चोरून पलायन करणार्या राजस्थान येथील परप्रांतीय युवकाला प्रवाशांनी रंगेहात पकडून यथेच्छ चोप दिला. यावेळी पोलिसांना बोलावून त्याला त्यांच्या ताब्यात दिले.
मळगाव येथे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी आहे. याचाच फायदा घेत चोरी करण्याच्या उद्देशाने या युवकाने कुडाळ-तेंडोली येथील प्रवाशाची बॅग चोरली व तो रेल्वेत जाऊन बसला. ही बाब संमजताच प्रवाशांनी त्याला पकडून चोप दिला. तसेच पोलिसांना स्टेशनवर बोलाविण्यात आले. पोलिस येताच त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस त्याच्यावर पुढील कारवाई करीत आहेत.