सिंधुदुर्ग

Ambergris Smuggling Case: पणदूर तिठ्यावर ‘अंबरग्रीस’ तस्करीचा पर्दाफाश; सिंधुदुर्ग LCBची मोठी कारवाई

या धडक कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले असून पोलीस पुढील तपास करत आहेत

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील पणदूर तिठा परिसरात आज (दि.30) शनिवारी सायंकाळी उशिरा एलसीबीच्या पथकाने धडक कारवाई केली. व्हेल माशाच्या उलटीच्या (अंबरग्रीस) कथित तस्करीचा सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला.

गोपनीय माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात लाखो रुपये किमतीचा संशयित मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन ते चार संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. यामध्ये कुडाळ आणि मालवण तालुक्यातील संशयितांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान पणदुर परिसरात ही कारवाई एलसीबीने केली आहे. पोलीस स्थानकात रात्री तक्रार दाखलची कारवाई सुरु असल्याचे कुडाळ पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी सांगितले.

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पथकाने पणदूर तिठा परिसरात सापळा रचला. संशयित तेथे येताच पोलिसांनी अचानक कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत कथित तस्करीसाठी वापरण्यात आलेली एक कार आणि एक दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. कारवाईनंतर जप्त केलेला मुद्देमाल आणि ताब्यात घेतलेल्या संशयितांना घेऊन एलसीबीचे पथक पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल झाले. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू असून, एलसीबीने कारवाईला दुजोरा दिला आहे. एलसीबीच्या या धडक कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT