Namdev Gharal
आपण बऱ्याचवेळा पाहतो की किनारपट्टी भागातून मोठ्या प्रमाणात व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होत असते. याची किंमत कोट्यवधीमध्ये असते
अंबरग्रीस ही फक्त स्पर्म व्हेल (Sperm Whale) या माशाच्या पोटामध्ये तयार होणारी वस्तू आहे. मेणासारखी वास असलेली वस्तू आहे.
हे तयार कसे होते - स्पर्म व्हेलचा मुख्य आहार हा स्क्विड असतो. या स्क्विडचा पाठीमागील भाग चोचेसारखे कठीण असतो. व्हेल मासा ते पूर्ण पचवू शकत नाही
व्हेल चे शरीर त्यांना हा अपचन न झालेला भाग पोटातच ठेवते त्याच्यावर हळूहळू मेणासारखा एका पदार्थ साचत राहतो
असे खूप दिवस राहिल्यानंतर पचनसंस्थेत तो अंबरग्रीस बनतो. मोठा झाल्यानंतर हा गोळा व्हेलच्या शरीरातूनबाहेर पडतो फक्त उलटीनेच नाही तर मलावाटे बाहेर पडतो
हा बाहेर पडल्यावर समुद्रात अनेक महिने–वर्षे तरंगत राहतो त्याला गोड, मातीचा, मस्की, फुलांचा सुगंध येऊ लागतो — जो परफ्युम उद्योगात अमूल्य मानला जातो.
सूर्य, हवा आणि समुद्राच्या खारट पाण्यामुळे त्याचा वास बदलतो नुकताच बाहेर पडलेल्या ताज्या अंबरग्रीसला मासळीसारखा वास असतो.
महाग का ? हे अंत्यत अत्यंत दुर्मीळ असते जगातील फक्त १% स्पर्म व्हेलच्या शरीरातच अंबरग्रीस तयार होते.
याचे नैसर्गिक, कृत्रीम उत्पादन करता येत नाही पूर्णपणे व्हेलच्या शरीरातूनच तयार होते. तसेच अंथाग समुद्रात असा छोटा तुकडा सापडणे अतिशय अवघड असते.
परफ्युमला लाँग-लास्टिंग सुगंध धरून ठेवण्याची क्षमता देते (Fixative). जगातील महागडे परफ्युम ब्रँड अंबरग्रीसचा वापर करतात.
गुणवत्ता व तरंगणाऱ्या कालानुसार याची किंमत वाढत जाते. जितका जास्त काळ समुद्रात तरंगेल, तितका सुगंध वाढतो व याची किंमत वाढत जाते. लाखोंपासून कोटींपर्यंत