Nitesh Rane  pudhari photo
सिंधुदुर्ग

Nitesh Rane |सावंतवाडी उपविभागीय अभियंतावर चिखलफेक केल्याप्रकरणी नितेश राणे यांना कारावासाची शिक्षा

महामार्ग अभियंत्यावर चिखलफेकप्रकरणी न्यायालयाचा निकाल

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : महामार्ग प्राधिकरण सावंतवाडी उपविभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना जिल्हा न्यायाधीश१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी सोमवारी कलम ५०४ अन्वये दोषी ठरवत त्यांना एक महिना कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर अन्य २९ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. ४ जूलै २०१९ ला हे प्रकरण घडले होते.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाच्या पाहणीसाठी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आ. नितेश राणे यांनी उपविभागीय अभियंता प्रकाश शेडेकर यांना बोलवून घेतले होते. यावेळी त्यांचे अन्य सहकारीही उपस्थित होते. पाहणीदरम्यान कणकवली गडनदी पुलावर प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखल ओतण्यात आला होता.

तसेच त्यांना महामार्ग सेफ्टीकरीता वापरल्या जाणाऱ्या कापडी पट्टीने बांधून ठेवून त्यानंतर ढकलत चालत नेले होते. याप्रकरणी प्रकाश शेडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नितेश राणे यांच्यासह अन्य २९ अशा ३० संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT