Devendra Fadnavis Pudhari Maha Summit 2026 Pudhari
सिंधुदुर्ग

Devendra Fadnavis On Nitesh Rane: मंत्री नितेश राणे हे हिंदू नायक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pudhari News Maha Summit 2026: पुढारी .'महा समिट-26' कार्यक्रम उत्साहात

पुढारी वृत्तसेवा

Devendra Fadnavis On Nitesh Rane Pudhari News Maha Summit 2026

मुंबई : मंत्री नितेश राणे हे हिंदू नायक आहेत. हिंदुत्वाकरिता ते काम करत आहेत, यापुढेही त्यांनी हिंदुत्वाकरिता काम करत राहावे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री राणे यांचे कौतुक केले.

पुढारी न्युज चॅनलच्या तिसऱ्या वर्धापन दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोबत राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे देखील खास उपस्थित होते. मुंबईतील हॉटेल ट्रायडेंट मध्ये हा कार्यक्रम झाला.'महा समिट-26' या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत पुढारी न्युजचे संपादक प्रसन्ना जोशी यांनी घेतली. दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव, पुढारी समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव हे उपस्थित होते.

या मुलाखतीत जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना आपला आवडता हिंदुत्ववादी नेता कोण? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, हिंदुत्वासाठी जे काम करतात ते सर्व माझे आवडीचे आहेत. मंत्री नितेश राणे हे सुद्धा हिंदू नायक आहेत. हिंदुत्वाकरिता ते काम करत आहेत. यापुढे त्यांनी असे हिंदुत्व करिताकाम करायला हवे. हिंदुत्वाचा मूळ गाभा सहिष्णुता आहे,असे असले तरी थोबाडात मारणाऱ्याच्या थोबाडीतच मारली पाहिजे, असेही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मंत्री नितेश राणे यांनी खास उपस्थिती दर्शवत पूर्णपणे मुख्यमंत्र्यांची मुलाखत ऐकली. त्याबरोबरच पुढारी न्युज च्या वर्धापन दिनानिमित्त संपादक प्रतापसिंह जाधव आणि चेअरमन डॉ. योगेश जाधव यांना शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत पुढारीचा मोठा वाटा

पुढारी न्युज चैनल च्या वर्धापन दिनानिमित्त मंत्री नीतेश राणे यांनी सांगितले की,पुढारी समूहाचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत फार मोठा वाटा आहे. पुढारी हे प्रभावी माध्यम आहे.याही पुढे महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये पुढारी समूहाचा वाटा राहणार आहे.महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे जे उद्दिष्ट आहे ते गाठण्यासाठी पुढारीचे योगदान निश्चितपणे राहील. असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT