सावंतवाडी : मित्रांसह गोवा येथे फिरण्यासाठी आलेल्या प्रथमेश भैरू माने (23, रा. निपाणी-बेळगाव) याचा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. प्रथमेश माने हा मित्रांसह गोवा येथे फिरण्यासाठी आला होता.
त्याला गोव्यात अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी म्हापसा रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला घरी जाण्यास परवानगी देण्यात आली.
5 रोजी तो आपल्या निपाणी या गावी परतत असताना त्याला इन्सुली येथे अस्वस्थ वाटू लागले. तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.