Nilesh Rane, Navnath Ban File Photo
सिंधुदुर्ग

Nilesh Rane: 'अब्दुल सत्तार यांची जीभ विषारी...'; नवनाथ बन यांना इशारा देत निलेश राणे नेमकं काय म्हणाले?

शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

मोहन कारंडे

Nilesh Rane:

मुंबई: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांच्या निकालानंतर शिंदे गटाच्या नेत्यांच्या कारवाया आणि त्यासंद‌र्भातील पक्षाची भूमिका वादात सापडली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी "मी निलेश राणेंवर टीका करणार नाही, ते माझे मित्र आहेत. पण धनगेकर आणि सत्तार यांच्याबद्दल शिवसेनेने उत्तर द्यावे, असे ते म्हणाले. यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी मात्र, 'ते माझे मित्र नाहीत' म्हणत बन यांचा समाचार घेतला.

आमदार निलेश राणे काय म्हणाले?

सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेत बोलताना निलेश राणे म्हणाले की, "नवनाथ बन तुझे करिअर आता सुरू झाले. नवनाथ माझा मित्र नाही, मी २००९ मध्ये खासदार होतो. मी त्याला मित्र म्हणत नाही. आम्हाला बनने शिकवू नये. आम्ही याला उत्तर का द्यायचे आम्ही आमच्या नेत्याना बोलू," असे ते म्हणाले. अब्दल सत्तार यांच्याबद्दल बोलताना राणे म्हणाले की, "अब्दुल सत्तार काय बोलतात याकडे मी लक्ष देणार नाही. ते कॉंग्रेसमध्ये असतानाही बोलत होते. त्यांची जीभ विषारी आहे," असे राणे म्हणाले.

पुणे पदवीधर निवडणुकीबाबत बोलताना राणे म्हणाले की, "नियोजन कुठे चुकले यावर विचार मंथन व्हावे. शिंदे साहेबांवर खापर कशाला फोडता? आमच्याकडे पदवीधरसाठी उमेदवार कोण? हे आमच्या तेथील नेत्याला माहितच नव्हते. आता आरोप-प्रत्यारोप नको. माझ्या मालवण निवडणुकीत काय झाले, हे बोललो तर अनेक पुस्तके उघडतील," असा इशारा त्यांनी बन यांना दिला.

पुढे बोलताना राणे म्हणाले की, "बन याने पुर्णेकर विषयात शिंदेसाहेबांची बाजू घेतली का? भाजप आमचाच पक्ष आहे. कोणीतरी येणार आणि आम्हाला प्रश्न विचारतो. हा नवनाथ निवडणूक कशी जिंकला हे माहिती आहे का? त्याच्या बाजूचा प्रभाग मला माहिती आहे. सर्वच नेते माझे आहेत. शिंदे भाजपमुळे मुख्यमंत्री झाले म्हणता, उठाव कोणी केला, तब्बल ४० आमदार आमचे होते. यावर काय बोलणार?" असा सवाल त्यांनी केला.

शिंदे शिवसेनेला भाजपचे खडे बोल

एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने आपल्याच मित्रपक्षांना अडचणीत आणले. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नाही. त्यामुळे महायुतीच्या तीन जागा गेल्या, या शब्दांत भाजपने गुरूवारी शिवसेना शिंदे गटाच्या भूमिकेवर हल्ला चढविलाः तर, महायुतीधर्म झुगारून पाठीत खंजीर खुपसणाऱ्या रवींद्र धंगेकरांसारख्या झारीतील शुक्राचार्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणीही भाजपकडून करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT