सावंतवाडी ः नेमळे येथील जागृत देवस्थान श्री देव कलेश्वर मलेश्वर पंचायतनाचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. श्री देव मलेश्वर देवस्थान शुचिर्भूत असून देवाच्या दर्शनाला येणारे भाविक दहा दिवस शुद्ध शाकाहारी राहून मलेश्वर देवाचे दर्शन घेतात अशी वर्षांनुवर्षांची परंपरा आहे.
हे नियम पाळूनच हजारो भाविक या जत्रोत्सवाचा लाभ घेतात. यानिमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम, रात्री पालखी तसेच रात्री आजगांवकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन देवस्थानचे मानकरी यांच्याकडून करण्यात आले आहे.