Sindhudurg News : विनापरवाना मासेमारी करणारी परप्रांतीय नौका जप्त

मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाची देवगड समुद्रात कारवाई
Sindhudurg News
विनापरवाना मासेमारी करणारी परप्रांतीय नौका जप्तfile photo
Published on
Updated on

देवगड ः देवगड समुद्रात 10 वाव क्षेत्रात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या ‌‘भारद्वाज‌’ या परप्रांतीय नौकेवर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाई करीत ही नौका जप्त केली. ही नौका कर्नाटक येथील अशोक गोपाल सालिन (रा. मल्लपी- कोडूवूर, जि. उडपी) यांच्या मालकीची आहे. ही कारवाई शनिवारी रात्री 10.45 वा. च्या सुमारास करण्यात आली. नौका कारवाईसाठी देवगड बंदरात आणण्यात आली आहे.

Sindhudurg News
Bihar Election : प्रचार रणधुमाळीत राहुल गांधींची 'मासेमारी', काँग्रेसने पोस्‍ट केला Video

देवगडचे सहा. मत्स्य विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे हे पोलिस कर्मचारी श्री. पाटील तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक यांच्ा पथकासमवेत देवगड समुद्रात शनिवारी रात्री नियमित गस्त घालत होते. यावेळी देवगड किनाऱ्या समोर सुमारे 10 वाव खोल समुद्रात एक नौका मासेमारी करताना दिसून आली. या पथकाने नौके जवळ जात परवाना कागदपत्रांची मागणी केली असता, खलाश्यांकडे महाराष्ट्र सागरी हद्दीत मासेमारी करण्याचा परवाना नसल्याचे उघड झाले. मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने ही तात्काळ ही नौका ताब्यात घेत कारवाईसाठी देवगड बंदरात आणली.

कर्नाटक राज्याच्या सागरी जलक्षेत्रासाठी मासेमारी परवाना असलेल्या या नौकेवर तांडेलासह काही खलाशी होते. सहा.आयुक्त (मत्स्य व्यवसाय) यांच्या मार्गदर्शनाखाली या नौकेवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 तथा सुधारणा अधिनियम 2021 च्या तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे. नौकेवरील मासळीची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. सुनावणीअंती नौकेच्या संबंधित मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Sindhudurg News
Raigad News : नौका किनाऱ्यावर ; मासेमारी उद्योग ठप्प

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news