अनिकेत उचले
कणकवली ः वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या 48 व्या नाथ पै एकांकिका स्पर्धेत खुल्या गटात मित्र शिरगावच्या ‘आईतवार’ने प्रथम क्रमांक मिळवला. अक्षर सिंधु कणकवलीच्या ‘भरकाट’ने द्वितीय तर डी.बी.जे महाविद्यालयाच्या ‘पाकिस्तान’चे यानने तृतीय क्रमांक मिळविला. कलासक्त मुंबईच्या ‘पेंडुलय’ने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- दिग्दर्शन - प्रथम- डॉ. राजेंद्र चव्हाण(आईतवार), द्वितीय-सुहास वरुणकर (भरकाट), योगेश कदम (पेंडुलय), तांत्रिक अंगे - प्रथम -प्रमोद तांबे, द्वितीय-शुभम जाधव, तृतीय-साहिल देसाई. अभिनय पुरुष- प्रथम-प्रमोद तांबे (भूमिका रमा), द्वितीय-शुभम जाधव (भूमिका श्याम), तृतीय -साहिल देसाई (भूमिका सदाशिव). अभिनय स्त्री -प्रथम भाग्यश्री भोगटे (भूमिका आई), द्वितीय-मनश्री पाठक (भूमिका सीता), तृतीय-सृष्टी करंदीकर (सौम्या). उत्तेजनार्थ - सुमित घाग (भूमिका बाबा), डॉ. यशश्री कंटक (भूमिका माधवी). मामा वरेरकर लेखन पुरस्कार माजी गटविकास अधिकारी तथा लेखक विजय कदम यांना मिळाला.
या स्पर्धेचे परीक्षण तुषार भद्रे, प्रदीप वेंगुर्लेकर, डॉ. प्रिया जामकर यांनी केले. स्पर्धा पार पडल्यानंतर शालेय व खुल्या गटातील विजेत्यांना तुषार भद्रे, प्रदीप वेंगुर्लेकर, डॉ. प्रिया जामकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. संस्थेचे कार्यवाह ॲड. एन. आर. देसाई, डॉ. समीर नेवरे, विश्वस्त दामोदर खानोलकर, सीमा कोरगावकर, लीना काळसेकर, प्रसन्ना देसाई, शशिकांत उर्फ टिकू कांबळी, सिद्धेश खटावकर, शरद सावंत, राकेश काणेकर, कांचन खानोलकर, अमिता आमडोसकर, विक्रांत सामंत, महेश चिंदरकर, सोनाली कोरगावकर, सोहम राणे, धनराज दळवी, मयुर वाघमारे आदी उपस्थित होते.