Narayan Rane 75th Birthday 
सिंधुदुर्ग

Narayan Rane 75th Birthday | मला भावलेले 'दादा' !

Narayan Rane 75th Birthday | सन १९९० चा तो काळ मला आजही आठवतोप, शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी विधानसभेच्या तत्कालीन कणकवली-मालवण मतदारसंघाचे उमेदवार महणून सन्माननीय दादांना कोकणच्या राजकारणात पाठवले.

पुढारी वृत्तसेवा

सन १९९० चा तो काळ मला आजही आठवतोप, शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी विधानसभेच्या तत्कालीन कणकवली-मालवण मतदारसंघाचे उमेदवार महणून सन्माननीय दादांना कोकणच्या राजकारणात पाठवले. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे म्हणजे आमच्यासारख्या युवकांचे दैवतच जणू त्यांचे ठाकरी शैलीतील जाज्वल्य विचार ऐकून मी शिवसेनेकडे आकर्षिक झालो होतो.

त्यातव शिवसेनाप्रमुखांनी नारायण राणेसारखा लढवण्या असलेला कोकणचा सुपुत्र येथे उमेदवार दिल्याने माझा उत्साह द्विगुणित झाला होता. मला सक्रिय राजकारणाचा कसलाही अनुभव नसताना केवळ शिवसेनेच्या प्रेमापोटी मी नारायण राणे यांच्यासोबत कणकवली वालुक्यात गावोगाव प्रचार केला. त्या काळातील धुळीने माखलेले रस्ते तुडवत प्रत्येक गावातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचलो. सुदैवाने आमच्या या कष्टाचे चीज झाले. सन्माननीय नारायण राणे कणकवली-मालवण मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आले, आपल्या विजयानंतर सन्माननीय दादांनी माझ्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप माझ्या राजकीय वाटचालीत प्रेरणा देणारी ठरली.

(त्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सन्माननीय नारायण राणे यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार महगून महाराष्ट्र काँग्रेसचे बडे नेते व महत्वाचे म्हणजे माझ्या भिरवंडे गावचे सुपुत्र व माझे काका असलेले वाय. डी. सावंत उभे होते.) मात्र केवळ शिवसेनाप्रमुख व शिवसेनेवरील प्रेमापोटी त्यावेळी मी स्वकीयांचा विरोध पत्करण्याचे धाडस केले. दरम्यान, १९९० साली आमदार झाल्यानंतर सन्माननीय दादांनी राजकारणात कधी मागे बडू पाहिले नाही. पुढे राज्य मंत्रिमंडळात मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद आमदार, राज्यसभेचे खासदार, केंद्रीय मंत्री व आता लोकसभेच्या सनागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार हा त्यांचा राजकीय प्रवास निश्चितच हेवा वाटावा असा आहे.

या राजकीय वाटचालीत साहेब न्या-ज्या पदांवर विराजमान झाले त्या प्रत्येक पदाला त्यांनी प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला सन्माननीय दादांच्या जीवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे स्थान अत्युच्च आहे. राजकीय अपरिहार्यतमुळे दादा कुठल्याही पक्षात असले तरी त्यांनी नेहमीच शिवसेनाप्रमुखांना आपले दैवत मानले. यामुळेच ते आजही २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण रख शिवसेनाप्रमुखांच्या तत्त्वाचे कटाक्षाने पालन करतात. मदत करताना ते कधी जात, पंथ, धर्माचा विचार करत नाहीत.

गरजवंताला मदत करायची, माणुसकीचा धर्म पाळायचा याच सद्‌हेतून ते मदत करतात. कोणी टीका केली, नाम ठेवले तरी आपले काम करत रहायचे. स्वप्न मोठी पाहायचे व ते सत्यात उतरवायचे. मग त्यासाठी कितीही कष्ट, परिश्रम करावे लागोत. आपले प्रत्येक काम भव्यदिव्य व समाजोपयोगी असायला हवे. हा त्यांचा अट्टाहास नव्हे जिद, असा या अद्वितीय व्यक्तिमत्त्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करताना मीसुद्धा नकळत त्यांचे हे गुण आत्मसात केले आज जे काही मी सामाजिक उपक्रम राबवतो, त्यामागची माझी खरी प्रेरणा सन्माननीय दादा हेय आहेत.

कदांनी माझ्यावर नेहमीच पुत्रवत प्रेम केले. माझ्या प्रत्येक राजकीय संघर्षात ते नेहमीच माझ्यामागे पहाड मनून उभे राहायचे, राजकारणात कार्यकर्ते कसे सांभाळावेत, समाजाचे प्रश्न कसे सोडवावेत, प्रशासनासमोर विकासाचे प्रश्न, जनतेच्या समस्या कशा मांद्यव्यात, लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासनावर बचक कसा ठेवावा, हे सर्व काही मी सन्माननीय दादांची कार्यपद्धती पाहूनच शिकलो. माझ्या राजकीय जीवनात दादांनी मला व माझी पत्नी सौ. संजना हिला नेहमीच न मागता सर्वकाही दिले. म्हणूनच 'नारायण राणे हाथ माझा पक्ष' असे मी नेहमीच अभिमानाने सांगतो.

विकासकामे व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी 'राजकीय इच्छाशक्ती कशी दाखवायची हे सन्माननीय दादांकडूनच शिकावे. मला आठवते सन १९९० साली 'दादा' जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा कोकणात घड सते नव्हते, साकव व पूल नव्हते. पावसाळी हंगामात तर कोकणी जनतेला जीव मुठीत घेवूनच पुराने भरलेले नदी, नाले पार करावे लागत. आपल्या कोकणवासीयांची ही परवड स्वतः अनुभवलेल्या दादांनी त्यावेळी मुंबईतून 'बेस्ट'च्या गाडांच्या जुन्या चेसीसासंगी स्वखयनि आणून गावागावात साकव बांधून दिले. त्यातील काही साकव आज ३५ वर्षानंतर आजही उत्तमरित्या कार्यान्वित आहेत.

इच्छाशक्ती असेल तर जनतेचे प्रश्न कसे सोडवता येतात हे दादांनी स्वतः प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. आज कोकणातील गावागावातील व वाडीवस्त्यांवरील रस्ते डांबरी आहेत. गावागावात नळपाणी योजना कार्यान्वित आहेत. अनेक धरणे, तलाव, बंधाऱ्यांची कामे मार्गी लागली आहेत. आधुनिक शिक्षणाच्या सुविधा जिल्ह्यात उपलब्ध होत आहेत. सिंधुदुर्ग देशातील पहिला पर्यटन जिल्हा बनला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न आज राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. कधीकाळी राज्यातील मागास जिल्हा म्हणून ओळखला जाणारा सिंधुदुर्ग जिल्हा आज राज्यातील नव्हे तर देशातील एक प्रगत जिल्हा माणून ओळखला जात आहे. यामागे नारायण राणे या ध्येयवेड्या संघर्ष योद्धाचे अपार कष्ट व मेहनत आहे, ही बाब नाकारता येणार नाही राजकारणातील माझे हे दैवत आज ७५ व्या वर्षात म्हणजेच 'अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. परमेश्वर त्यांना यापुढेही दीर्घायू देवो व कोकणची सेवा यापुढेही आणखी जोमाने करण्याची ताकद देवो, अशी प्रार्थना मी माझे ग्रामदैवत श्री रामेश्वर चरणी करतो.

नांदगाव दंगलीच्या काळाची आठवण

साधारणतः १९८९ चा काळ असेल. नांदगाव येथे काही कारणांमुळे मोठा वाद झाला होता. जातीय तेढ निर्माण होऊन दंगलसदृश परिस्थिती झाली होती. काहीतरी विपरित पडले, एवढेच आम्हाला माहिती होते. त्यावेळी भी राजकारणातही नव्हतो. आम्ही भिरवंडेत रहायचो. फक्त काहीतरी घडले आहे, एवढेच आम्ता मित्रांना समजले होते. काय घडले, याची उत्सुकता होती. आम्ही अगदी विद्यार्थी दशेतील तरुण होतो. हाफ पेंटमध्येच कणकवलीत आलो. त्यावेळी नारायण राणे हे नांदगाव येथील घटनांच्या पार्श्वभूमीवर काणकवलीत आले होते, असे गोट्या सावंत यांनी सांगितले.

दादांनी प्रचारासाठी गाडी दिली

त्यावेळी हा मतदारसंघ, आमचा विभाग म्हणजे काँग्रेसचे वर्चस्व असलेला भाग होता. मात्र वंदनीय शिवसेनाहधमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांची म्हणजेच आमच्या दादांची उमेदवारी घोषीत केली होती. त्यावेळी पक्षात झोकून देऊन काम करण्याचे बेड आमच्यात होते. त्यामुळे कोणतीही अपेक्षा न करता आम्ही अहोरात्र झटून काम करीत होतो. त्यावेळी आम्ही चाबाजी परब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत होतो. त्यांच्या नेतृत्वात प्रचाराची धुरा सांभाळत होतो. दादांनी आम्ही करीत असलेले काम पाहिले होते. दादांनी आम्हा कार्यकत्यांना बोलावून घेतले. आम्हाला प्रचारासाठी कमांडर जीप दिली. त्या जीपचा नंबर ८७८८ होता. आणि तेव्हापासून आमचा प्रचारही जोमात सुरू झाला, श्री. सावंत सांगत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT