मळगाव : जोशी मांजरेकरवाडी येथे हायवेवर कलंडलेली खासगी आराम बस. (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Mumbai Goa Highway Accident | मुंबई-गोवा महामार्गावर मळगांव येथे बस कलंडली

अपघातानंतर रस्त्यालगत एका झाडाला ही बस अडकल्याने अनर्थ टळला आणि या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप-पत्रादेवी बायपासवर मळगाव जोशी मांजरेकर वाडी येथे एका खासगी बसचा अपघात होऊन ती रस्त्याच्या कडेला कलंडली. सुदैवाने, अपघातानंतर रस्त्यालगत एका झाडाला ही बस अडकल्याने अनर्थ टळला आणि या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

‘महालक्ष्मी ट्रॅव्हल्स’ची ही बस गोवा ते मुंबई जात होती. मळगाव जोशी मांजरेकर सर्कलनजीक ही बस समोर असलेल्या मारुती ओमनी गाडीला पाठीमागून धडकली. धडक दिल्यानंतर बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या डाव्या बाजूला घसरून कलंडली. सुदैवाने रस्त्यालगत असलेल्या अकेशियाच्या झाडाला बस अडकल्यामुळे ती पूर्णपणे उलटली नाही आणि मोठा अपघात टळला. अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाला. बसमध्ये चालकाव्यतिरिक्त क्लिनर आणि तीन प्रवासी होते. अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले.

महामार्ग पोलिस आणि सावंतवाडी पोलीसांनी घटनास्थळी जात स्थानिकांच्या मदतीने मदत कार्य सुरू केले आणि बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या मदत कार्यात दीपक जोशी, संजय जोशी, शैलेंद्र पेडणेकर, अजय राऊळ, बाळा आरविंदेकर, शिवम जोशी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी सहभाग घेतला. उशिरापर्यंत या अपघाताबाबत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT