MLA Nilesh Rane 
सिंधुदुर्ग

MLA Nilesh Rane | 'गावाच्या पाण्याला हाथ लावाल तर गाठ माझ्याशी!'

MLA Nilesh Rane |आ. नीलेश राणेचा बिल्डरला इशारा : ग्रामस्थांशी साधला थेट संवाद

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा
पिंगुळी पाझर तलावाच्या संरक्षणारून निर्माण वादाच्या पार्श्वभूमीवर आ. नीलेश राणे यांनी पिंहुळी ग्रामपंचायतीला भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोताला कोणताही धोका निर्माण होऊ देणार नाही, तसेच ग्रामस्थांच्या मागण्यांचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत संबंधित डेव्हलपरल प्रकल्पाचे काम करू देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

'तुमच्या गावाच्या प्रश्नावर मी सर्वात पुढे उभा राहीन,' असा विश्वास देताना या आंदोलनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी विरोधकांवर केला.
सरपंच अजय आकेरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, सभापती मिलिंद नाईक, तहसीलदार सचिन पाटील, संजय आंग्रे, आनंद शिरवलकर, संजीव परब, सागर रणसिंग, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

आ. राणे म्हणाले, पाझर तलावाला हात लावला जाणार नाही, पायवाट बंद केली जाणार नाही आणि तलावातील पाणी प्रदूषित होणार नाही, या ग्रामस्थांच्या मागण्या मान्य आहेत. ग्रामस्थांना गैरसोय होणार नाही, यासाठी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा केली आहे. संबंधित डेव्हलपरला सर्व प्रश्न मार्गी लागेपर्यंत काम थांबवण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात याव्यात. गावाच्या हिताच्या विरोधात कोणालाही मनमानी करू दिली जाणार नाही.

ग्रामस्थांनी कोणतीही काळजी करू नये, त्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी आपण ठामपणे उभे राहू, असे त्यांनी सांगितले. जि. प. सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी यापूर्वी विविध निवेदने घेऊन आपली भेट घेतली थी. आपण दोन वेळा बैठकीसाठी बोलावूनही ते उपस्थित राहिलेले नाहीत. आंदोलनाचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच चर्चा करून तो सोडविता आला असता.

मात्र, आता याविषयाचे राजकीय भांडवल केले जात असल्याचा आरोप राणे यांनी केला. काही माजी लोकप्रतिनिधी ग्रामस्थांच्या प्रश्नांपेक्षा राजकीय श्रेयाला अधिक महत्त्व देत असल्याची टीकाही त्यांनी केली. ग्रामस्थांच्या मूळ मागण्या योग्य असून, त्यासाठी डेव्हलपरशी थेट चर्चा करून प्रश्न सोडवण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी पिंघुळीतील विकासकामांचाही उल्लेख केला. अजय आकेरकर यांनी मांडलेल्या बंधाऱ्याच्या प्रश्नासह अन्य विकासकामांचे प्रस्ताव मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. डिसेंबरनंतर विकासकामांच्या भूमिपूजनासाठी पुन्हा गावात येण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

गावातील रस्त्यांच्या प्रश्नासह पाणीपुरवठा आणि ग्रामपंचायत इमारतीच्या विषयाकडे आमदारांचे लक्ष वेधले. नवीन ग्रामपंचायत इमारतीच्या कामासाठी आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. ग्रामस्थांमधून व्यंकू पांगुळ यांनी पाझर तलावालगतचा प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT