देवगड : सांडवे-मसुरकरवाडी येथील राघोजी महादेव मसुरकर (वय 78) हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या मुलगा नीलेश राघोजी मसुरकर यांनी देवगड पोलिसात स्थानकात दिली आहे.
राघोजी मसुरकर हे शनिवारी 4 ऑक्टोबर रोजी स. 8 वा.च्या सुमारास कोणालाही न सांगता घराबाहेर पडले. ते परत आले नसल्यामुळे त्यांची शोधाशोध करण्यात आली.
मात्र त्यांचा कोठेही शोध लागला नसल्याने त्यांचा मुलगा नीलेश यांनी वडील बेपत्ता असल्याची तक्रार देवगड पोलिसात रविवारी दिली. याबाबत अधिक तपास सहा. पोलिस उपनिरीक्षक ए. बी. पवार करत आहेत.