Devgad Heavy Rain | देवगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे 53 हजार 900 रुपयांचे नुकसान

वाडा येथे गोठा, शिरगाव मध्ये घरची पडवी तर हिंदळे येथे घरावर माड पडून नुकसान
Devgad Heavy Rain
Devgad RainPudhari File Photo
Published on
Updated on

देवगड : देवगड तालुक्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सलग पाच दिवसांपासून कोसळणार्‍या पावसामुळे गावोगावी अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज पावसाने जोर कमी झाला असल्याने जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. या अतिवृष्टीमुळे तालुक्यात एकूण 53 हजार 900 रुपयांचे नुकसान झाले असून आजपर्यंत एकूण 2608 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे गेल्या 24 तासांत 80 मि.मी. पाऊस झाला आहे.

तालुक्यातील वाडा येथील श्री. विजय दत्ताराम वाडेकर यांच्या गोठ्याचे छप्पर कोसळून अंदाजे 13,900 रुपयांचे , शिरगाव येथील श्री.संजय शिवराम चौकेकर यांच्या घराची पडवी कोसळून अंदाजे 25,000 रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Devgad Heavy Rain
Devgad News | देवगडमध्ये बौद्ध बांधवांची 'महाविहार मुक्ती' निर्धार रॅली

तालुक्यातील वाडा येथील श्री. विजय दत्ताराम वाडेकर यांच्या गोठ्याचे छप्पर कोसळून अंदाजे 13,900 रुपयांचे , शिरगाव येथील श्री.संजय शिवराम चौकेकर यांच्या घराची पडवी कोसळून अंदाजे 25,000 रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर हिंदळे येथील कमलाकर महादेव मयेकर यांच्या घराच्या पडवीवर नारळाचा माड पडून अंदाजे 15,000 रुपयांचे नुकसान झाले आहे.असे एकूण 53 हजार 900 रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात आज दुपार पासून पावसाने थोडी विश्रांती घेतली असून अधूनमधून हलक्या सरी कोसळत आहेत.

Devgad Heavy Rain
Devgad News | देवगडमध्ये बौद्ध बांधवांची 'महाविहार मुक्ती' निर्धार रॅली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news