कुडाळ : मांडकुली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. 1 मधील चोरीप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांकडून या चोरीसंदर्भात ठोस माहिती मिळण्याची शक्यता आहे.
अज्ञात चोरट्याने शाळेचा दरवाजा फोडून कॅनॉन कंपनीचा कलर प्रिंटर, समई, दोन माईक, साउंड मशीन, भिंतीवरील घड्याळ असे 11 हजार 700 रु. चे साहित्य लंपास केले होते. याबाबतची फिर्याद मुख्याध्यापक सुयोग मारूती धामापूरकर यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे.
अज्ञाताविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व कुडाळ पोलीसानी तपास सुरू केला आहे. यादरम्यान संशयित म्हणून दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती कुडाळ पोलिस स्थानकातून देण्यात आली.