सिंधुदुर्ग

Crime News | मालवण-वायरी येथे तरुण व्यावसायिकाची आत्महत्या

Crime News | वायरी-भूतनाथ येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या ३९ वर्षीय तरुणाने बेडशीटच्या साहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

पुढारी वृत्तसेवा

मालवण : पुढारी वृत्तसेवा

वायरी-भूतनाथ येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या ३९ वर्षीय तरुणाने बेडशीटच्या साहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. रुपेश विष्णू कुरले (वय ३९, मूळ रा. सर्जेकोट, मालवण; सध्या रा. वायरी भूतनाथ, मालवण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

रूपेश हा ट्रॅव्हल व्यावसायिक होता. मयत रुपेश हा गेल्या १० वर्षांपासून वायरी भूतनाथ येथे भाड्याची खोली घेऊन एकटाच राहत होता, तर त्याची पत्नी रेश्मा ही दोन मुलींसह मूळ गावी सर्जेकोट येथे राहते. रविवारी रात्री ९.३० वा. च्या सुमारास रुपेशचे मॅनेजर अक्षय सरमळकर यांनी रुपेशच्या खोलीचा दरवाजा उघडत नसल्याची माहिती त्याचा भाऊ महेश कुरले यांच्याकडे चालक म्हणून काम करणारे वैभव कल्याण आजगावकर (२९, रा. सर्जेकोट) यांना फोनवरून दिली.

मॅनेजरचा फोन आल्यानंतर वैभव आजगावकर तातडीने वायरी-भूतनाथ येथील रुपेशच्या खोलीवर पोहोचले. तेथे दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी खोलीच्या खिडकीतून लांब काठी घालून दरवाजाची कडी आतून उघडली. आत जाऊन पाहिले असता रुपेश याने गळफास घेतल्याचे दिसून आले.

हा प्रकार उघडकीस येताच नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या मदतीने रुपेशला तातडीने खाली उतरवून ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तो मृत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी वैभव आजगावकर यांनी मालवण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार मालवण पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT