Malvan Tourism Controversry (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Malvan Tourism Controversy | मालवणच्या पर्यटनाची बदनामी; व्यावसायिक झाले आक्रमक

सोशल मीडियावरील प्रकार : माफी न मागितल्यास पोलिसांत तक्रार करणार

पुढारी वृत्तसेवा

संबंधीत व्यक्तीची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येणार असल्याचेही श्री. तोडणकर यांनी सांगितले. एका व्यक्तीने मालवणच्या पर्यटनाची सोशल मीडियावरून बदनामी केल्याचे निदर्शनास येताच त्याचे तीव्र पडसाद पर्यटन व्यवसायिकांमध्ये उमटले. याबाबत मालवणातील पर्यटन व्यावसायिकांनी बंदर जेटी येथे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

श्री. तोडणकर म्हणाले, ज्य व्यक्तीने मालवणच्या पर्यटनाची बदनामी केली, त्याचा आम्ही सर्व पर्यटन व्यावसायिक तीव्र निषेध करत आहोत. संबंधिताने मालवणच्या पर्यटनाबाबत केलेले आरोप बिनबुडाचे व खोडसाळ आहेत. जर त्याच्याकडे याबाबतचे पुरावे असल्यास त्याने ते सादर करावेत, अन्यथा त्याने मालवणातील पर्यटन व्यावसायिकांची जाहीर मागावी. पर्यटन व्यवसाय वाढविण्यासाठी आम्ही बरीच वर्षे प्रयत्न केले आहेत. अशा परिस्थितीत खोटी माहिती पसरवून कुणी येथील पर्यटनाची नाहक बदनामी करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. आम्ही याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फ्रान्सिस फर्नांडिस, अन्वय प्रभू, आबा शिर्सेकर, योगेश मेस्त्री, मनोज मेथर, एजाज मुल्ला, विनायक परब, रोहन आचरेकर, अमोल सावंत,ष जॉन्सन रॉड्रिक्स, नूतन रोगे, विशाल गोवेकर, किरण हुर्णेकर, महेश कोयंडे, गोविंद धुरी, हेमंत रामाडे, रोहित मेथर यांच्यासह अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

आम्ही सर्व पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटन वाढण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आम्ही आमचा व्यवसाय प्रामाणिकपणे करत आहोत. अशा परिस्थितीत जर कोणी मालवणच्या पर्यटनाची बदनामी करत असेल ते आम्ही खपवून घेणार नाही. याबाबत आम्ही पोलिस निरीक्षकांचे लक्ष वेधले आहोत. संबंधिताविरोधात कायदेशीर कारवाईसाठी भूमिका घेतली जाणार आहे.
- अन्वेषा आचरेकर पर्यटन व्यावसायिक- मालवण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT