मालवण : शिवसेनेच्या मालवण शहरातील नवनियुक्त पदाधिकार्‍यांना आ. नीलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Malvan Ideal City Plan | मालवण आदर्श शहर बनविणार : आ. नीलेश राणे

Better Services For Citizens And Tourists | नागरिक आणि पर्यटक यांना अधिक सेवा सुविधा देणार : नगरोत्थान व अन्य योजनेतून निधी उपलब्ध करणार

पुढारी वृत्तसेवा

मालवण : मालवण ह विकसित होणारे शहर आहे. याठिकाणी मोठया संख्येने पर्यटक दाखल होतात. या सर्वांचा विचार करता नागरिक आणि पर्यटक यांना अधिक सेवा सुविधा देण्यासाठी नगरोत्थान व अन्य योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईल. आताही 54 कोटी निधी मंजूर झाला आहे. विकासकामे व नागरी सुविधा या माध्यमातून मालवण शहर आदर्श शहर बनवणार, असा निर्धार आ. नीलेश राणे यांनी व्यक्त केला.

मालवण शहरातील शिवसेना नवनियुक्त पदाधिकारी व उपस्थित नागरिक यांच्याशी आ. राणे यांनी संवाद साधला. सर्वसामान्य जनता केंद्रस्थानी ठेवून काम झाले पाहिजे. जनतेला, पर्यटकांना समास्या निर्माण होता नये. यासोबत कचरा, पार्किंग व अन्य ज्या समस्या आहेत त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. राणे म्हणाले.जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, समन्वयक महेश कांदळगांवकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, बबन शिंदे, मच्छीमार आघाडी जिल्हाप्रमुख राजा गांवकर, शहरप्रमुख दीपक पाटकर, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर, शहर उप तालुकाप्रमुख अरुण तोडणकर आदी उपस्थित होते.

आ. नीलेश राणे यांनी सर्व बंधारे मंजूर केले : दत्ता सामंत

निलेश राणे आमदार झाल्यानंतर विकासकामांचा धडाका लावला आहे. देवबाग ते आचरा किनारपट्टी भागात सागरी अतिक्रमण बाधित सर्वच ठिकाणी नागरिकांना सुरक्षिता मिळाली पाहिजे यादृष्टीने सर्व बंधारे मंजूर करून घेतले. सुमारे 250 कोटी पेक्षा जास्त निधी मंजूर करून आणला.

रस्ते विकासासाठीही मोठा निधी मंजूर करून घेतला आहे. पावसाळ्यानंतर बहुतांश सर्व रस्ते मार्गी लागतील. शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी या सर्वच क्षेत्रात आ. राणे यांची कामगिरी प्रभावी ठरली आहे. सभागृहात अभ्यासू नेतृत्व जनता अनुभवत आहे. अश्या भावना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.

शिवसेना मालवण शहर कार्यकारिणी

शहरप्रमुख दीपक पाटकर यांच्या नेतृत्वात मालवण शहर संघटक राजू बिडये, शहर समन्वयक सहदेव बापार्डेकर, उपशहरप्रमुख जगदीश गांवकर, अभय कदम, राजन परुळेकर, दत्तात्रय केळूसकर, कमलेश कोचरेकर, शहर सचिव महेश सारंग, कोषाध्यक्ष लक्ष्मण शिर्सेकर, सहसचिव सुरेंद्र फाटक यांसह शाखाप्रमुखपदी विलास मुणगेकर, साईनाथ बांबूळकर, रामचंद्र पराडकर, निलेश लुडबे, प्रमोद मराळ, नरेश कोयंडे, दिगंबर पाटील, जेम्स डायस, जगदीश वालावलकर, रणजित खांदारे, सागर पाटकर, वैभव तोंडवळकर, जॉन्सन फर्नांडिस, सूर्यकांत राजापूरकर, संदीप मालंडकर, शिवाजी केळूसकर, गणेश परब, संतोष इब्रामपूरकर, बाबू वायंगणकर आदी पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT