Malvan LED Fishing  
सिंधुदुर्ग

Malvan LED Fishing | मालवणच्या दर्यात रत्नागिरीच्या एलईडी नौकेवर मत्स्य विभागाची मोठी कारवाई

Malvan LED Fishing | मालवण-देवबाग सागरी क्षेत्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभाग गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील भुवनेश्वरी या एलईडी मासेमारी नौकेवर धडक कारवाई करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मालवण : पुढारी वृत्तसेवा

मालवण-देवबाग सागरी क्षेत्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभाग गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील भुवनेश्वरी या एलईडी मासेमारी नौकेवर धडक कारवाई करण्यात आली आहे. विनापरवाना मासेमारी केल्याप्रकरणी ही नौका जप्त करण्यात आली असून, सदर नौका सर्जेकोट-मालवण बंदरात अवरुद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सागरी हद्दीत एलईडी लाईटस् वापरून मासेमारी नौकांकडून होणाऱ्या अवैध मासेमारीला चाप लावण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. ३० मार्च रोजी रात्री ९ वा. च्या सुमारास देवबाग सागरी क्षेत्रात गस्त घालताना रत्नागिरी जिल्ह्यातील 'भुवनेश्वरी' ही एलईडी नौका विनापरवाना मासेमारी करताना आढळून आली.

देवबाग समुद्रात ११-१२ सागरी मैल अंतरात ही नौका बंदी असलेली एलईडी प्रकाशझोत लावून अनधिकृत मासेमारी करत होती. महेश मनोहर आयरे (रा. शिरगाव-रत्नागिरी) यांच्या मालकीची ही नौका आहे.

नौकेवर तांडेलसह एकूण २ खलाशी होते. याचा सविस्तर अहवाल सिंधुदुर्गचे मत्स्यव्यवसाय सहा. आयुक्त सागर कुवेसकर यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. या कारवाईत सागरी सुरक्षा पर्यवेक्षक मायबा, परब, जाधव, जुवाटकर, सावजी यांचे सहकार्य लाभले.

पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांच्या दिशा निर्देशानुसार अनधिकृत मासेमारीविरोधात कठोर भूमिका घेत आहे. या पुढेही अशा प्रकारे अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मत्स्यव्यवसाय सहा. आयुक्त सागर कुवेसकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT