मळगाव : मुंबई -गोवा हायवेवर मळगाव येथे भरधाव जाणार्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी दुपारी मळगाव - वेत्ये येथे चॉकलेट फॅक्टरीसमोर घडली. जखमी दुचाकी चालकाला रिक्षामधून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
याबाबतची माहिती वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी दिली. हायवेवर मोठ्या प्रमाणात अपघात होतात. त्यामुळे अॅम्ब्युलन्सची सोय करावी, अशी मागणी त्यांनी केली. संबंधित दुचाकी चालक जखमी असल्यामुळे नेमकी माहिती समजू शकली नाही.