मुंबई : बैठकीत उपस्थित मंत्री नितेश राणे. सोबत प्रवीण परदेशी, जयश्री भोज, संदीप साटम आदी. (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Kunkeshwar Temple Protection | कुणकेश्वर मंदिराला हानी न होता कोस्टल प्रकल्प राबवा

Nitesh Tane | आढावा बैठकीत मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिर परिसरात रेवस-रेड्डी कोस्टल हायवे अंतर्गत एमएसआरडीसीकडून चौथर्‍याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने बुधवारी मुंबई निर्मल भवन येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन कार्यालयात मंत्री नीतेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत मंदिराला कोणतीही हानी होणार नाही, याची दक्षता घेवून प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी अधिकार्‍यांना दिले.

रेवस-रेड्डी कोस्टल हायवे अंतर्गत एमएसआरडीसीकडून कुणकेश्वर येथील रस्त्याचे पुनर्वसन आणि अपग्रेडेशन करण्यात येत आहे. याबाबत आढावा बैठकीत मंत्री राणे यांनी सदर प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली. श्रीक्षेत्र कुणकेश्वर हे कोकणवासीयांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे मंदिराला कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेऊन प्रकल्प पूर्ण करा, असे मंत्री राणे यांनी यावेळी दिले.

या बैठकीस एमआयटीआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, महाराष्ट्र पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे संचालक अभय पिंपरकर, एमआयटीआरएचे वरिष्ठ सल्लागार निखिल नानगुडे, संदीप साटम उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT