कुडाळ शहरातून भरधाव जाणार्‍या चार डंपरवर कारवाई  (Pudhari Photo)
सिंधुदुर्ग

Speeding Dumpers Kudal | कुडाळ शहरातून भरधाव जाणार्‍या चार डंपरवर कारवाई

Kudal police action | रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे भरधाव वेगात वाहन चालवल्या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी चार डंपरवर कारवाई केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे भरधाव वेगात वाहन चालवल्या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी चार डंपरवर कारवाई केली आहे. ही कारवाई कुडाळ शहरात बुधवारी दिवसभरात करण्यात आली. या चारही डंपधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुडाळ- वेंगुर्ला रोडवर पोलीस स्टेशन समोर बुधवारी दुपारी 12 वा. केलेल्या कारवाईत मुबारक हुसेन शेख ( 46 वर्ष, रा.आझाद नगर,चंदगड, जि.कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद महिला पोलीस हवालदार ज्योती रायशिरोडकर यांनी दिली. दुपारी 12:20 वा. कुडाळ- वेंगुर्ला रोडवरील सिटीसेंटर समोर केलेल्या कारवाईत सिद्धारूद मडीवालप्पा इटी( 40 वर्ष, रा. मबनुर, ता- सौंदत्ती) या डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद महिला पोलीस हवालदार ज्योती रायशिरोडकर यांनी दिली.

कुडाळ -वेंगुर्ला रोडवर सिटी सेंटर समोर दुपारी 12:30 वा. केलेल्या कारवाईत अमर शंकर चव्हाण,(25) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद पोलीस हवालदार मेघश्याम भिवा भगत यांनी दिली. दुपारी 12:40 वा. कुडाळ सिटी सेंटर समोर केलेल्या कारवाईत किरण देऊ पाटील(27, रा.करमतम धाबा,ता. धारबांधोडा, साउथ गोव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद पोलीस हवालदार अमोल बडंगर यांनी दिली आहे. या सर्वांवर रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे भरधाव वेगात वाहन चालवल्या प्रकरणी बीएनएस 281 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT