सावंतवाडी : आंबेगाव - रुपणवाडी येथील एका तरुणाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी 7.30 वा. रुपणवाडी कॉजवेवर घडली. प्रशांत चंद्रकांत दळवी (वय 38) असे या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी शोधमोहिमेदरम्यान कॉजवेपासून चाळीस फूट पुढे कुणकेरी रवीचे भाटले येथे ओहोळात त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबेगाव- रुपणवाडी कॉजवे पाण्याखाली गेला होता. दरम्यान, सायंकाळी प्रशांत हा आपल्या घरी चालत जात असताना त्याने पाण्याखाली गेलेला कॉजवे ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. ही घटना काहींनी पहिली. ग्रामस्थांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र ओहोळाला मोठा पूर असल्याने शिवाय काळोख झाल्याने त्याला शोधण्यात अडचणी येऊ लागल्या.
दरम्यान, मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह या ओहळाच्या पात्रातच घटनास्थळापासून सुमारे 40 मीटरवर आढळून आला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. सोमवारी सायंकाळी आंबेगाव ग्रामस्थांसह पोलिस महसूल अधिकारी, तलाठी यांनी शोध मोहीम राबवली. मात्र काळोख झाल्यामुळे ही शोधमोहीम थांबवण्यात आली होती. प्रशांत दळवी याच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मुलगा, मुलगी, भाऊ, भाऊजी असा परिवार आहे. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला असून पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबेगाव- रुपणवाडी कॉजवे पाण्याखाली गेला होता.
दरम्यान, सायंकाळी प्रशांत हा आपल्या घरी चालत जात असताना त्याने पाण्याखाली गेलेला कॉजवे ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. ही घटना काहींनी पहिली. ग्रामस्थांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र ओहोळाला मोठा पूर असल्याने शिवाय काळोख झाल्याने त्याला शोधण्यात अडचणी येऊ लागल्या.