सिंधुदुर्ग : अजित सावंत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी ७० हजार ते १ लाख टनापर्यंत आंबा उत्पादन होते. मात्र, यंदा हवामान बदलामुळे उत्पादनात खूपच घट झाली असून, आंब्याची निर्यातही घटणार हे वास्तव आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि देवगड हापूसला परदेशात दरवर्षी मोठी मागणी असते. मात्र, घटलेल्या उत्पादनामुळे परदेशी निर्यातीवर यंदा परिणाम होणार आहे. दरवर्षी होळी उत्सवाबरोबरच हापूस आंब्याचे स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणात आगमन होते. यावर्षी होळी उत्सव संपून पाडवा जवळ आला तरी आंबा बाजारात दिसत नाही. याचा परिणाम म्हणून शेतकरी, बागायतदारांचे अर्थकारणच बिघडणार आहे.
महाराष्ट्रात सुमारे ६ लाख हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड असून रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे १ लाख २५ हजार हेक्टर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ३४ हजार हेक्टर आणि रायगड जिल्ह्यात सुमारे १७हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड आहे. सिंधुदुर्गात देवगड तालुक्यातून सर्वाधिक आंब्याचे उत्पादन होते. त्याखालोखाल वेंगुर्ले, मालवण तालुक्यात आणि इतर तालुक्यातील आंबा लागवड आहे.
देवगड हापूससह कोकणातील आंब्याला देशांतर्गत आणि परदेशात मोठी मागणी असते. सिंधुदुर्गातील विशेषतः देवगडचा विशेष प्रसिध्द हापूस आंबा उत्तम चव आणि सुगंधासाठी युरोप, लंडन, अमेरिका, कॅनडा, कुवेत आणि इतर आखाती देशामध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. पणन महामंडळामार्फत व अनेक शेतकरी, उत्पादक कंपन्या आणि थेट बागायतदार मध्यस्थांना टाळून आंबा निर्यात करतात.
कोकणातील सुमारे अडीच लाख मेट्रिक टन उत्पादनापैकी सुमारे १० ते १५ मेट्रिक टन फळाची तर १० हजार मेट्रिक टन मॅगो पल्पची परदेशात निर्यात होते. त्यातून सुमारे ४०० कोटींचे परकीय चलन मिळते. देशातून परदेशात निर्यात होणाऱ्या आंब्यापैकी ७० टक्के आंबा हा महाराष्ट्रातून निर्यात होतो.
पणन मंडळाच्या सुविर्धाचा वापर करून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लड, युरोप, जपान, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, मलेशिया इ. देशामध्ये आंबा निर्यात होतो. परदेशी निर्यातीला फळाची प्रत चांगली असणे महत्त्वाची असते. सिंधुदुर्गसह कोकण पट्ट्यातील आंबा निर्यातीमुळे स्थानिक ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागला आहे. मात्र यंदा उत्पादनच मुळात ५ ते १० टक्क्यांवर आल्याने देशासह परदेशी निर्यातीवर देखील मोठा परिणाम होणार असल्याचे आंबा बागायतदारांनी सांगितले.
घेतलेले कर्ज फेडायचे कसे?
आंबा पिकासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी मोठी मशागत करावी लागते. खते, फवारणी औषधे आणि मजुरीवर मोठा खर्च होतो, मात्र यंदा जेमतेम उत्पादनामुळे झालेला खर्चही वसूल होणार नाही. मग बँकांचे घेतलेले कर्ज फेडायचे कसे? असा प्रश्न शेतकरी बागायतदारांसमोर आहे.
एका दृष्टिक्षेपात आंबा
06 लाख हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड
महाराष्ट्रात 01 लाख 25 हजार हेक्टर लागवड
रत्नागिरी जिल्ह्यात 34 हजार हेक्टरवर आंबा लागवड
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 17 हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड
रायगड जिल्ह्यात 10-15 मे. टन फळाची, तर 10,000 मे. टन मँगो पल्पची निर्यात कोकणातून 400 कोटींचे परकीय चलन मिळते फळ आणि पल्प निर्यातीतून 70 टक्के आंबा महाराष्ट्रातून निर्यात होतो एकूण निर्यात होणाऱ्या आंब्यापैकी 2022-23 मध्ये देशातून 22,968 मेट्रिक टन आंबा निर्यात झाला 18,933 मेट्रिक टन आंबा निर्यातीचा वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे 2023-24 मध्ये 32, 104 मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली होती 25,203 मेट्रिक टन आंबा निर्यात झाला होता केवळ महाराष्ट्रातून 2024-2025 मध्ये 29,938 मेट्रिक टन निर्यात 21,871 मेट्रिक टन आंबा निर्यात झाला होता महाराष्ट्रातून