कासार्डे : कासार्डे माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्रशालेच्या प्रांगणात आयोजित आनंदाचीवारी मध्ये पालखीतील रिंगण सोहळा सादरीकरण करून पंढरीच्या पांडुरंगाला विठ्ठल नामाच्या गजरात आणि टाळ मृदंगाच्या तालात साद घातली. ज्ञानोबा तुकाराम !,पुडिलका वरदेव हरी!! विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय!! जयघोषांनी परिसर दुमदुमून सोडला.
या पालखीसोबत प्रशालेतील छोटे छोटे 100 पेक्षा अधिक मुले मुली सहभागी झाले होते. यात पालखीचे भोई म्हणून राज कुडतरकर व अन्वेश नारकर यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली तर विठ्ठल- मंथन ओटवकर, लक्ष्मण मेघारी,रूखमाई - मौर्वी महाडिक व गौरवी राणे यांनी तर राधा-कृष्ण, निधी मोरे, सिया कोनाडकर, संत मुक्ताबाई सावी मुद्राळे, संत जनाबाई वैदेही देवरुखकर, संत मिराबाई वैष्णवी कातकर, संत बहिणाबाई ऋतिका गोसावी, संत कान्होपात्रा रक्षा देसाई, संत चांगुला स्वरा गिरी तर दिंडी चोपदार वीर नकाशे, संत एकनाथ स्वरूप कुंभार, संत सोपानदेव आर्यन दराडे, संत नामदेव उन्मेश कोकरे, संत तुकाराम चैतन्य सावंत व संत निवृत्तीनाथ अभिषेक देवरुखकर आदी विविध संतांची वेशभूषा केलेले विद्यार्थी सर्वात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले तर मृदुंगमणी म्हणून अश्मेश लवेकर व ओम ठुकरूल यांनी उत्कृष्ट भूमिका पार पाडली.
या रिंगण सोहळ्यात पालखीतील विविध ’वारकरी खेळांचे सुमारे 25 पेक्षा अधिक वारकरी बनलेल्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पध्दतीने पारंपरिक खेळांचे अतिशय छान सादरीकरण केले.तर कु.निधी मोरे व कु. सिया कोनाडकर या दोघींनी माझ्या डोईवर घागर भरली रे ही गवळण नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.