कणकवलीत वृद्धेचा आगीत होरपळून मृत्यू  (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Elderly Woman Fire Death | कणकवलीत वृद्धेचा आगीत होरपळून मृत्यू

उशाला अगरबत्ती लावण्याची सवय बेतली जीवावर

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : कणकवली शहरातील भालचंद्रनगर कांबळी गल्ली येथे राहत असलेल्या रत्नप्रभा शंकर पंडित (85) या सोमवारी सांयकाळी राहत असलेल्या फ्लॅटमध्ये जळालेल्या व आगीमध्ये पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. फ्लॅटमध्ये त्या एकट्याच राहत होत्या. त्या झोपलेल्या कॉटवरील गादी व अंथरून जळून खाक झालेले होते. त्यामध्ये होरपळून रत्नप्रभा पंडित यांचा मृत्यू झाला.

कणकवली शहरातील भालचंद्रनगर येथील कामत कॉर्नर या बिल्डिंगच्या दुसर्‍या मजल्यावर रत्नप्रभा पंडित राहत होत्या. या दुर्घटनेची खबर त्यांच्या बहिणीचे मुलगे संतोष सुखटणकर यांनी कणकवली पोलिसात दिली. संतोष सुखटणकर यांच्या त्या मावशी होत्या. सुखटणकर यांची बहिण चित्रा शिरोडकर हिच्या कामत कॉर्नर बिल्डिंगमधील त्या फ्लॅटमध्ये अविवाहित असलेल्या त्यांच्या मावशी रत्नप्रभा पंडित राहत होत्या.

हळवल ब्राह्मणवाडी येथील मुळच्या असलेल्या रत्नप्रभा पंडित गेली सुमारे 20 वर्षापासून त्या फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्या एकट्याच तेथे राहत असल्याने संतोष सुखटणकर हे तिथे जावून येवून असायचे. त्याच फ्लॅटच्या हॉलमध्ये सुखटणकर यांनी आपल्या एमआर व्यवसायाचे औषधांचे बॉक्स बाजूला रचवून ठेवलेले आहेत. त्याच हॉलमध्ये मावशी रत्नप्रभा पंडीत एका बाजूला लोखंडी कोटवर झोपत असत. त्या वयस्कर असल्यामुळे जेवण बनवत नसत. त्यांना जेवणाचा डबा श्री. मुळे हे देत असत त्या व्यतिरिक्त चहा व नाश्ता त्या स्वतः बनवत असत. त्यांना स्वप्न पडत असल्याने झोपताना आपल्या जवळ अगरबत्ती लावण्याची सवय होती.

रत्नप्रभा पंंडीत यांना जेवणाचा डबा देणार्‍या सौ. मुळे यांनी सोमवारी सायंकाळी 6.53 वाजता संतोष सुखटणकर यांना फोन करून दुपारी डबा देण्यासाठी गेले असता मावशीला हाका मारल्या, दरवाजा ठोकावला परंतु त्यांनी दरवाजा उघडला नाही किंवा प्रतिसाद दिलेला नाही. तसेच दरवाजाला आतून कडी आहे, असे सांगितले. त्यांनतर संतोष सुखटणकर यांनी मधू पाटील, अवधूत सुतार व संतोष सुतार यांनी कटावणीच्या सहाय्याने ठोकून आतील कडी काढून दरवाजा उघडला. त्यावेळी मावशी रत्नप्रभा पंडित ही जळालेल्या व आगीमध्ये होरपळलेल्या अवस्थेत कॉटच्या खाली उताण्या अवस्थेत बेशुद्ध पडलेली होती.

प्रथम दर्शनी ती मयत असल्याचे दिसून आल्याचे संतोष सुखटणकर यांनी सांगितले. ती ज्या लोखंडी कॉटवर झोपली होती त्यावरील गादीसह चादरी व सर्व अंथरून जळून खाक झालेले होते. त्यानंतर संतोष सुखटणकर यांनी आपले माईन गावात राहणारे भाऊ अनिल सुखटणकर यांना बोलावून घेतले. त्यानंतर स्थानिक नागरिक व शेजार्‍यांच्या मदतीने रत्नप्रभा पंडीत यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्या मयत असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT