अपघातग्रस्त वाहने. Pudhari Photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg Road Accident Update |जामसंडे येथे सहलीची बस व कार यांच्यात धडक

कारमधील एक जखमी ; अपघातग्रस्त बस तासगावमधील ज्युनि. कॉलेजची काही विद्यार्थीही किरकोळ जखमी

पुढारी वृत्तसेवा

देवगड : देवगड-विजयदुर्ग मार्गावर जामसंडे-आझादनगर येथील धोकादायक वळणावर शैक्षणिक सहलीची आरामबस आणि कार यांच्यात समोरसमोर धडक बसून झालेल्या अपघातात कारमधील एकजण जखमी झाला असून त्याचा उजव्या डोळ्याकडील वरच्या बाजुला गंभीर दुखापत झाली आहे.हा अपघात शुक्रवारी सायंकाळी 5.30 वा.सुमारास घडला.

सांगली -तासगाव येथील वसंतदादा पाटील ज्युनि. कॉलेजची शैक्षणिक सहल शुक्रवारी सकाळी खाजगी आरामबसने सिंधुदुर्ग मध्ये आली होती. या बसमध्ये शिक्षक व 45 विद्यार्थी होते. शुक्रवारी सकाळी मालवण येथे सिंधुदुर्ग किल्ला पाहून दुपारी देवगडमध्ये कुणकेश्वर दर्शन घेवून सायंकाळी ते विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी जात होते.

दरम्यान सांय. 5.30 वा. विजयदुर्ग मार्गावर जामसंडे -आझादनगर येथील धोकादायक वळणावर विजयदुर्ग ते देवगड येणार्‍या कारची व आरामबसची समोरून जोरदार धडक झाली. या धडकेने कार आपटून मागे गेली. या अपघातात कारचा दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले तर कारचालक युवराज अडसुळे यांच्या बाजुला बसलेले साग वठारकर(50, रा.कोल्हापूर) यांच्या उजव्या डोळ्याचा वरच्या बाजुला गंभीर दुखापत झाली.

त्यांना उपचारासाठी देवगड ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले.अपघाताची माहिती समजताच आझादनगर मधील स्थानिक ग्रामस्थ, तसेच जामसंडे परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली. देवगड पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार प्रवीण सावंत, प्रसाद आचरेकर यांनीही घटनास्थळी जात स्थानिक ग्रामस्थांच्या सहायाने मदतकार्य राबविले.अपघातग्रस्त वाहने बाजुला घेण्यासाठी संजय शेडगे व ग्रामस्थांनी मदत केली. आरामबसमधील काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. विद्यार्थ्यांसमवेत चार शिक्षक होते.तर कारमधील तिघेही हे कोल्हापूर येथील असून व्यावसायिक कामानिमित्त ते देवगड मध्ये आले होते. विजयदुर्ग भागातील काम आटोपून ते सायंकाळी देवगडमध्ये येत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT