इर्शाद शेख  
सिंधुदुर्ग

‘सी आर्म’ मशिन निधी परत जाण्यास जबाबदार कोण? : इर्शाद शेख

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : शासकीय मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग येथील आर्थोपेडिक विभागासाठी आवश्यक सी आर्म मशीन खरेदीसाठी 2 कोटी 13 लाख रुपयाचा निधी शासनाच्या अनागोंदी कारभारामुळे परत गेला आहे. एकीकडे आवश्यक सोयीसुविधांअभावी गोरगरीब जनतेला उपचारांसाठी बाहेरगावी धाव घ्यावी लागते. तर शासनाकडून मंजूर सुविधाही घेता येत नाहीत, याला जबाबदार कोण? हे पैसे टक्केवारीसाठी परत गेले की मेडिकल कॉलेज बंद करण्यासाठी? हा निधी परत जाण्यास पालकमंत्री अन्य मंत्री जबाबदार आहे, असा सवाल सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले.

सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये, बाळू मेस्त्री, महेश परब, कबरे शेख आदीं उपस्थित होते. ईशाद शेख म्हणाले, सिंधुदुर्ग वैदकीय महाविद्यालयासाठी महाविकास आघाडी सरकारने सन 2022-23 अर्थसंकल्पात सी आर्म मशीनसाठी 2 कोटी 13 लाख 4186 रुपये निधी मंजूर केला होता. हा निधी जिल्ह्याला प्राप्तही झाला होता. परंतु, महायुती सरकार सत्तेवर येताच हा निधी परत पाठविण्यात आला. यामागचे कारण काय? या प्रश्नी आपण वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले आहे. जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेज बंद करण्यासाठी तर हा घाट नाही ना? अशी शंका आहे.

यामुळे सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया होत नाहीत. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने आवाज उठविण्यात आला होता. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना निवेदन देत सी आर्म मशीन तात्काळ आणून ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया सुरू न झाल्यास आंदोलन छेडावे लागेल असा इशारा दिला होता. त्यादृष्टीने अधिष्ठाता डॉ. मनोज जोशी यांनी आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांना पत्र पाठविले होते.

शासन निर्णयानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग येथे यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदीसाठी 2 कोटी 13 लाख 4186 रू. रक्कम प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यात सी आर्म मशीन खरेदीचा समावेश असून सदर मशीनसाठी 60 लक्ष रू. इतकी रक्कम एसी देयका द्वारे कोषागारातून संचालनालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. सदर सी आर्म मशीन अद्याप अप्राप्त आहे, त्यामुळे ही रक्कम परत गेली असावी असा आमचा कयास आहे. यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होणार याला जबाबदार कोण? याचे आम्हाला उत्तर हवे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT