विधानसभेत मत्स्य व्यवसाय विभागाच्या मागण्या मांडताना मंत्री नितेश राणे. (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Sindhudurg Fishery Industry Development | मत्स्य व्यवसायाला राज्य सरकारचे पाठबळ

Nitesh Rane | 15.41 कोटींच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी; मंत्री नितेश राणे यांनी मांडल्या मागण्या

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे यांनी विधानसभेत मांडलेल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या 15 कोटी 41 लक्ष 92 हजार रुपयांच्या पुरवण्या मागण्यांना मंगळवारी विधान सभेत मंजुरी देण्यात आली. एवढ्या मोठ्या पुरवणी मागण्यांना मत्स्य व्यवसाय खात्यात प्रथमच मंजुरी मिळाली आहे.

पावसाळी अधिवेशनात मत्स्य व्यवसाय विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत सायटेशन सादर केले. 15 कोटी 41 लक्ष 92 हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध लाभार्थीभिमुख योजनांसाठी या पुरवणी मागण्यात तरतूद करण्यात आलेली आहे.

नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या मच्छीमारांच्या वारसांना सहाय्यता निधी, मच्छीमारांचे प्रशिक्षण व खात्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यासाठी आर्थिक तरतूद, गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाला चालना देणे त्यासाठीच्या योजना राबवणे, केंद्रीय मत्स्य संशोधन संस्थेद्वारे मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिनस्त जिल्हा कार्यालयातील मत्स्य अधिकारी यांना प्रशिक्षित करणे.

तसेच खात्याच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसिद्धी करणे. शेजारील देशाच्या हद्दीत आपले मच्छीमार अडकले असतील अशा मच्छीमारांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य करण्याची तरतूद या पुरवणी मागण्यात करण्यात आलेली आहे. एकंदरीतच पहिल्यांदाच अशा पद्धतीने सर्वच सर्वांगाने विचार करून पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT