वैभववाडी : गेले तीन-चार दिवस वैभववाडी तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाने भुईबावडा रिंगेवाडी येथील पांडुरंग महादेव राणे त्यांच्या घराची भिंत पडली. यात घरातील वयोवृद्ध महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. तर गुरुवारी नाधवडे- सरदारवाडी येथील केशव सावंत यांच्या बंद घरावर मोठे झाड पडून नुकसान झाले. जोरदार पाऊस पडत असल्यामुळे गणेश भक्तांच्या आनंदावर विरजन पडत आहे.
गेल्या मंगळवार पासून तालुक्यात पुन्हा जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाने तालुक्यातील नदी नाले पुन्हा एकदा दुथडी भरून वाहत आहेत. शुक्रवारी सकाळपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे भुईबावडा रिंगेवाडी येथील राणे यांच्या घराची भिंत कोसळली आहे.
ऐन गणेशउत्सवात राणे यांच्या घराची भीत कोसळल्यामुळे कुटुंबाची मोठी अडचण झाली आहे.घटनेची माहिती मिळताच सरपंच बाजीराव मोरे, पोलीस पाटील मनोज चव्हाण, तलाठी म्हस्के यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला आहे.v