जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी  pudhari Photo
सिंधुदुर्ग

मालवणमध्ये हत्तीरोगाचे चार रुग्ण आढळले

नगरपालिकेकडून युद्धपातळीवर सर्वेक्षण सुरु

पुढारी वृत्तसेवा

मालवण, पुढारी वृत्तसेवा : शहरात हत्ती रोगाच्या जंतू असलेली एक वृद्ध महिला मालवण येथे सापडली आहे. हत्तीरोगापासून बचाव करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे. सिंधुदुर्ग येथील जिल्हा परिषद आरोग्य विभाग येथील दालनात हत्ती रोग आणि किटकजन्य आजार याबाबत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी धुरी म्हणाल्या, मालवण शहरात हत्तीरोगाच्या निर्मूलनासाठी सातत्याने प्रयत्न करुन रुग्ण संख्या कमी झाली आहे. परंतु 8 जुलै रोजी मालवण सोमवार पेठ येथील 66 वर्षीय एक महिला हत्तीरोग जंतू सदृश्य आढळली. त्यानंतर सर्वेक्षणात गवंडी वाडा येथे दोन रुग्ण आढळून आले आहेत. या भागातील 1558 लोकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. यासाठी हत्तीरोगासाठी शहरामध्ये 1232 रक्तांचे नमुने घेण्यात आले आहेत. येथील कुटुंबांना 2 हजार 200 औषधांचे वाटप करण्यात आले आहे.

या तीन व्यक्तींमध्ये आता कोणतेही लक्षणे दिसून येत नाहीत, परंतु ब्लड सॅम्पल मध्ये जंतू सापडला असल्यामुळे आवश्यक उपचार सुरू केले आहेत. मालवण शहरांमध्ये सर्वेक्षण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने 10 टीमच्या माध्यमातून 46 कर्मचारी नेमले आहेत. 4355 कुटुंबांच्या सर्वेक्षणामध्ये रक्तांचे नमुने घेतले जाणार आहेत. शुक्रवारी (दि.26) सुरू होणाऱ्या या सर्वेक्षणासाठी 40 हजार 500 गोळ्या कोल्हापूर येथून मागविण्यात आले असून प्रत्येक कुटुंबामध्ये गोळ्या देण्यात येणार आहेत. मालवण शहर समुद्राच्या पासून उंच असल्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होत नाही, याचा परिणाम डासांच्या उत्पत्तीला होत आहे. यावर आरोग्य यंत्रणेने नगर परिषदेकडे यापूर्वीही कळविले आहे. आरोग्य यंत्रणा यासाठी सतर्क आहे गेल्या आठवड्यात आढळलेल्या या तीन हत्ती सदृश रुग्णांच्यासाठी सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT