Death Pudhari
सिंधुदुर्ग

Kankavli Woman Police Constable Death| कणकवलीच्या महिला पोलिस हवालदाराचा बिडवाडी-हुंबरणे जंगलात आढळला मृतदेह

Kankavli Woman Police Constable Death | या संशयास्पद मृत्यूमुळे पोलिस दलासह संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : पुढारी वृत्तसेवा

कणकवली पोलिस ठाण्यात महिला हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या स्मिता सचिन माने (३८, रा. कलमठ-नाडकर्णीनगर, मूळ रा. सांगवे-कनेडी) यांचा बिडवाडी-हुंबरणे येथील जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. दोन दिवसांपूर्वीच त्यांचे पती आणि पोलिस शिपाई सचिन माने यांनी पत्नीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. या संशयास्पद मृत्यूमुळे पोलिस दलासह संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

स्मिता आणि सचिन माने या दोघांची नुकतीच कणकवलीतून वैभववाडी पोलिस ठाण्यात प्रशासकीय बदली झाली होती. तेथे जाण्यासाठी सामानाची पॅकिंग करण्यासाठी दोघांनी ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी रजा घेतली होती.

८ ऑक्टोबरला रात्री जेवण करून कुटुंबसह झोपल्यानंतर, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता सचिन यांना जाग आली असता पत्नी घरात नव्हती. तिचा मोबाईलही हॉलमध्येच होता. त्यांनी सर्वत्र शोध घेतला; मात्र ती न सापडल्याने अखेर त्यांनी सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान अज्ञाताने पत्नीचे अपहरण केल्याची तक्रार रविवारी सकाळी कणकवली पोलिसांत दिली.

या तक्रारीनंतर पोलिस शोध घेत असतानाच रविवारी दुपारी बिडवाडी-हुंबरणे येथील जंगलात स्मिता माने यांचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थल धाव घेतली. अपहरणाची तक्रार आणि त्यानंतर आढळलेला मृतदेह यामुळे या मृत्यूचे गूढ वाढले आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT