Sindhudurg News : कणकवली बसस्थानकाची अतिरिक्त जागा न.पं.ला द्या

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे नगराध्यक्ष संदेश पारकर यांची मागणी
Sindhudurg News
कणकवली : ना.प्रताप सरनाईक यांना निवेदन देताना नगराध्यक्ष संदेश पारकर. सोबत राजन तेली आदी.
Published on
Updated on

कणकवली : कणकवली बसस्थानक व निवासस्थान परिसरातील अतिरिक्त मोकळी जागा नगरपंचायतीला भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच राष्ट्रीय महामार्गालगत असलेली मोकळी जागा नगरपंचायतीला व्यापारी तत्त्वावर वापरण्यास देण्यात यावी, अशी मागणी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली.

महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यादरम्यान कणकवली बसस्थानकाला भेट देत बसस्थानक व परिसराची पाहणी केली. यावेळी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ, शाल व फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले.

या भेटीदरम्यान नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी आमदार राजन तेली, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे, वैभव मालंडकर, सुजित जाधव, संतोष पुजारी, सौरभ पारकर, निकीत मुरकर, अमेय पारकर, उमेश आरोलकर, प्रशांत अंधारी, संजय पारकर यांच्यासह विभाग नियंत्रक दीपक घोडे, विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख, विभागीय यंत्र अभियंता सुजित डोंगरे, आगार व्यवस्थापक अजय गायकवाड तसेच विभागीय व आगार पातळीवरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बसस्नानक व निवासी संकुल परिसराचा नियोजनबद्ध विकास करून व्यापारी संकुल उभारल्यास नगरपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. तसेच बसस्थानक परिसराचे सुशोभीकरण, नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला चालना देणे शक्य होणार आहे असे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले. मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जागेबाबत माहिती घेत प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच या मागणीबाबत सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news