मळगाव : मातोंड येथील शेतकरी बाबा रेडकर यांच्या राहत्या घरातील अडगळीच्या खोलीतून 11 सापाची पिल्ले सर्पमित्र महेश राऊत यांनी रेस्क्यू करून पकडून नैसर्गिक अधिवासात सोडली.
मातोंड येथील डोंगराच्या पायथ्याशी जंगल भागाला लागूनच असलेल्या ठिकाणी शेतकरी बाबा रेडकर यांचे राहते घर आहे. गेले दोन महिने सतत पडणार्या पावसामुळे जंगलातील सापाने बाबा रेडकर यांच्या घरातील अडगळीच्या खोलीत आसरा घेऊन अंडी घातली असावी. घराच्या खोलीचा परिसर निवांत असल्यामुळे त्या ठिकाणी बाबा रेडकर आणि त्यांचे कुटुंबीय अधून मधून शेतीचे साहित्य ठेवण्यासाठी जात असत. काल शेतकरी बाबा रेडकर यांच्या पत्नीने त्या अडगळीच्या खोलीत प्रवेश केल्यावर सरपटणार्या 11 पिल्लांचा समूह तिच्या निदर्शना आला.
त्यावेळी बाबा रेडकर यांनी तुळस येथील सर्पमित्र महेश राहुल यांना त्या ठिकाणी पाचारण केले. त्यानंतर त्याने 11 सापाची पिल्ले हस्तगत केली. आणि येथील जंगल अधिवासात सोडली. बाबा रेडकर यांच्या घराच्या आजूबाजूचा परिसर हा जंगलमय असल्यामुळे त्या परिसरात सरपटणार्या प्राण्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळेच सुरक्षित स्थळ बघूनच सापाने आसरा घेऊन अंडी घातली असावी असा अंदाज यावेळी सर्पमित्र राऊळ यांनी व्यक्त करून शेतीचे उंदरापासून संरक्षण करणार्या सापाचे संवर्धन करावे असे आवाहन केलेयांनी व्यक्त केला रेडकर यांनी केले.