कणकवली : कणकवली कनेडी मार्गावर हरकुळ बुद्रुक मुडेश्वर मैदान जवळ सुकलेल्या स्थितीत सुरुची झाडे धोकादायक स्थितीत उभी आहेत. ही झाडे हलक्याशा वादळातही उन्मळून पडण्याचा धोका आहे. नेहमी रहदारीच्या मार्गालगत असलेल्या या झाडांच्या धोकादायक स्थितीकडे हरकुळ बुद्रुकचे सरपंच आनंद ठाकूर यांनी सा. बां. विभागाचे लक्ष वेधले आहे.
आचरा, कणकवली, हरकुळ बुद्रुक, कनेडी, फोंडा, वैभववाडी ते भुईबावडा असा हा राज्यमार्ग आहे. या रस्त्याच्या कणकवली शहराच्या हद्दीवर असलेल्या मुडेश्वर मैदानजवळ सुकलेल्या स्थितीत सुरुची झाडे धोकादायक उभी आहेत. ही झाड केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. परिणामी ती या मार्गावरून जाणारे वाहन चालक, प्रवाशी व पादचार्यांच्या जीवावर बेतणारी आहेत. काही वर्षांपूर्वी या रस्त्याच्या कणकवली ते कनेडी भागातील दुतर्फा असलेली झाडे आकेशियाची झाडे तोडण्यात आली होती, मात्र त्यातून ही सुरुची झाडे का वगळण्यात आली, हे यातील काही ही झाडे जळल्याने ती सुद्ध वाळलेल्या स्थितीत उभी आहेत.
ही धोकादायक झाडे तत्काळ तोडावीत, अशी मागणी आपण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार केली आहे. अधिकार्यांना याची कल्पना दिली आहे, मात्र अद्यापपर्यंत त्यावर कोणतीही उपाय योजना झालेले नाही, असे आनंद ठाकूर यांनी सांगितले.